Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त खर्दे विद्यालयात क्रांतिकारक वेशभूषा कार्यक्रम संपन्न..!
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त खर्दे विद्यालयात क्रांतिकारक वेशभूषा कार्यक्रम संपन्न..!
शिरपूर प्रतिनिधी:तालुक्यातील आर .सी.पटेल प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतिकारकांची वेशभूषेचा कार्यक्रम संपन्न झाला.
गावातील मुख्य चौकात प्रथमतः भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन खर्दे गावाच्या सरपंच सविताबेन पटेल यांनी केले. कार्यक्रमाला उपसरपंच नितीन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ पटेल, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष गुजर ,ग्रामपंचायत सदस्य,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती क्रांती जाधव, प्राचार्य पी.आर.साळुंखे,गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी भगतसिंग,राजगुरू, सुखदेव, महात्मा गांधी,वीर सावरकर, झाशीची राणी ,सुभाषचंद्र बोस अशा विविध भूमिकेतून देशप्रेमाची जाणीव करून दिली.उपस्थित ग्रामस्थांनीही वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हितेंद्र देसले तर आभार प्रदर्शन अमोल सोनवणे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य पी.आर.साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने अमोल सोनवणे,हितेंद्र देसले,ए जे पाटील,पी.एस अटकळे,बी.एस. बडगुजर,बी.एस.पावरा,सुनीता सूर्यवंशी,सीमा जाधव,सुनंदा निकम, मनीषा पाटील,रमेश शिरसाठ,श्रीमती छाया पाटील,एल. बी.राजपूत,रुपाली राजपूत,युवराज मिठभाकरे, राकेश पाटील यांनी प्रयत्न केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा