Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२
जिद्दीने आणि मेहनतीने मी कायदेतज्ञ पदवी प्राप्त केली-स्मिता शिंदे
खेड:-अक्षय कदम खूप खूप आनंद होतोय आज कायदेतज्ञ ही पदवी मिळाली. माझ्या जीवनातील सोनेरी दिवस,सोनेरी क्षण.माझ्या या यशात सर्वात महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे तो म्हणजे माझ्या बाबांचा.त्यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.त्यांचा कायम पाठिंबा मला होतो.
आणि त्यांचे संस्कार ह्या मुळेच मी वकील ही पदवी प्राप्त केली.पाच वर्षांच्या या प्रवासात अनेक संकट येत गेली,पाच वर्षाचा काल खूपच खडतर होतो,अनेक खाचखळगे होते,माझ्या समोर अनेक संकटरुपी डोंगर उभे होते.
परंतु आई बाबांच्या पाठिंब्यामुळे मी प्रचंड मेहनत केली.यांना वाटणारा हेवा,कौतुक,त्यांचे प्रोत्साहन यामुळेच यशाची पायरी मी सर केली.शेवटच्या टप्प्यावर माझा अभिमान असणारी माझी माऊलीच म्हणजे माझी आई हे जग सोडून गेली.दुःखाचा डोंगर कोसळला तरीही तिचे स्वप्न आणि माझी जिद्द पूर्ण करण्याची तयारी मनात निर्माण केली आणि हे घवघवीत यश संपादन मी केले.माझ्या यशात माझ्या बाबांचा आणि आईचा सिंहाचा वाटा आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा