Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा येथील वृक्ष संवर्धन समिती व शौर्य अकॅडमी ने वृक्ष लागवड करून घेतली संवर्धनाची जबाबदारी
शिंदखेडा येथील वृक्ष संवर्धन समिती व शौर्य अकॅडमी ने वृक्ष लागवड करून घेतली संवर्धनाची जबाबदारी
शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी
शिंदखेडा-येथील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय समोरील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह, शिंदखेडा येथे वृक्षसंवर्धन समिती व शौर्य अकॅडमी च्या वतीने 15 रोपांची लागवड करण्यात आली.
वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने मागील पाच वर्षांपासून वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम अविरत सुरू आहे.
या काळात शेकडो वृक्षांची लागवड करून संवर्धन समितीने केले आहे.
शिंदखेडा शहरातील रेल्वे स्टेशन रोड वरील, एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय समोरील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह येथे कडूनिंब,सिसम,जांभूळ,गुलमोहर असे 15 झाडांची लागवड करून संवर्धनाची जबाबदारी घेण्यात आली.
यावेळी वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष योगेश चौधरी,राजेंद्र मराठे,दिपक मराठे,शौर्य अकॅडमी चे प्रशिक्षक भूषण पवार,प्रशिक्षणार्थी दिपक नगराळे,
कुणाल पाटोळे,लक्ष्मण मोरे,सागर, हेमंत उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा