Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

परिवहन खात्यांच्या अधिका-यांचे खिसे भरणारे सीमा शुल्क तपासणी नाके (आरटीओ चेकपोस्ट) अखेर कधी बंद होणार...?



केंद्र शासनाच्या निर्णयाबाबत महाराष्ट्र परिवह विभागाचे अधिकारी अजूनही शाशंकितच...

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय ,केंद्र शासन यांचे पत्र क्र . RT- २३०१८ / ४७ / २०२१ - . दि .०६.० ९ .२०२१ . संदर्भीय पत्रान्वये श्री शशी भूषण , अवर सचिव भारत सरकार , रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांनी माहे जुलै २०१७ पासून सेवा व वस्तू कराची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यांच्या सीमांवर कोणतेही परिवहन तपासणी नाके असू नयेत असे कळविले आहे.मात्र असे असतांना देखील महाराष्ट्र राज्यातील सीमा तपासणी नाके आजपावतो सुरु आहेत. याबाबत कुठेतरी आता परिवह्न विभागाच्या प्रशासन अधिका-यांना यांची जाग आली.आणि अभय देशपांडे परिवहन आयुक्त (अंमल-2) यांनी याबाबत दि. 3 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्रातील ठाणे ,कोल्हापूर,पुणे , नाशिक ,धुळे ,लातूर ,नांदेड ,अमरावती , नागपूर ( ग्रामीण ) , पनवेल , उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ,जळगांव , यवतमाळ ,चंद्रपूर ,गोंदीया ,नंदुरबार , उस्मानाबाद , सोलापूर , सिंधुदुर्ग ,यांना महाराष्ट्र राज्यातील सीमा तपासणी नाके बंद करणेबाबत पत्र काढले असून याबाबत या सर्व सीमा तपासणी नाक्यांना सूचित करण्यात आले की,  आपल्या अधिनस्त सीमा तपासणी नाक्यांच्या शेजारील राज्यांतील सीमा तपासणी नाके बंद आहेत अगर कसे याबाबत आपल्या एका मोटार वाहन निरीक्षकास समक्ष भेट देवून वस्तुनिष्ठ अहवाल ( सीमा तपासणी नाक्यांच्या फोटोसहित ) सादर करण्यास आदेशित करावे.याबाबतचा आपला अहवाल तातडीने परिवहन आयुक्त कार्यालयास सादर करावा. सदर आधिका-याच्या यापत्रातून अतिशय स्पष्ट होते. 


की,केंद्र शासनाने सीमा शुल्क तपासणी नाके बंद करण्यात यावे.असे स्पष्ट म्हटले असतांना देखील महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागांच्या अधिका-यांना यातील स्पष्टता बोध होत नाही.का ? का, शेजारील राज्यांचे सीमा तपासणी नाके सुरु आहे की बंद यांची खात्री करण्याचे सांगितले जाते ? केंद्र शासनाच्या निर्णयाबाबत महाराष्ट्र परिवहन विभाग शाशंकीत कसा ? मग नेमका निर्णय कधी होणार ? अजून किती दिवस हे असेच आपल्या ‌ अधिकाऱ्यांचे खिसे भरणारे चेकपोस्ट नाके सुरु ठेवणार आहे ? असे कितीतरी प्रश्न चालक,मालक वहातूकदार व ट्रॉन्सपोर्ट संघ व संघटनांना पडलेला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध