Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२

शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथील कपिलेश्वर मंदिरात श्रावण मासनिमित्त संक्रांति उत्सवानिमित्त महाआरती व महाप्रसाद शिवसेना तालुका समन्वयक विनायक पवार यांच्या परिवार तर्फे आयोजन



शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी-तापी व पांझरा आणि गुप्त कपिल गंगा या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या अतिप्राचीन तीर्थक्षेत्र कपिलेश्वर महादेव मुडावद तालुका शिंदखेडा येथे श्रावण मास निमित्त भाविकांची गर्दी वाढली आहे श्रावण मास निमित्त दरवर्षी संक्रांति वर विविध कार्यक्रम संस्थान तर्फे आयोजित करण्यात येतात या वर्षी 17 ऑगस्ट रोजी श्रावण मास संक्रांति महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर संस्थानचे प्रमुख महामंडलेश्वर स्वामी हसानंद तीर्थ महाराज यांनी दिली आहे.

जळगाव व धुळे जिल्ह्याच्या सीमेवरील असलेल्या अति प्राचीन तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असे कपीलेश्वर महादेव मंदिर शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथे आहे.तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर असलेल्या या महादेव मंदिरावर दर महिन्याच्या संक्रांति तिथीवर उत्सव साजरा केला जातो कपिलमुनी ऋषींच्या तपसाधनाने ही भूमी पवित्र असून दर महिन्याला संक्रांति सर्व महोत्सव साजरा होत असताना यंदा श्रावण मास निमित्त 17 ऑगस्ट रोजी संक्रांतपर्व कार्यक्रमात शिंदखेडा तालुका शिवसेना समन्वयक विनायक पवार यांच्या हस्ते सपत्नीक तापीमाईचे विधीवत पुजा व श्री महादेव पूजन अभिषेक कार्यक्रम या दिवशी सकाळी सात वाजता पर्व स्नान नऊ वाजता तापी मातेची महाआरती त्यानंतर श्री महादेव जलाभिषेक कार्यक्रम अकरा वाजता करण्यात आला हयात पवार परिवारातर्फे माझी सैनिक भुषण पवार  भरत पवार यांच्या सह सर्वच परिवार उपस्थित होते. 

महामंडलेश्वर स्वामी हसानंद तीर्थ महाराज यांचे प्रवचन झाले त्यानंतर  महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला.शिंदखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते व शिंदखेडा तालुका शिवसेना समन्वयक विनायक पवार आणि त्यांच्या वर प्रेम करणारे नातलग,मित्र परिवार,तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन सदर उत्सवाचा आनंद घेतला.ह्यावेळी मंदिर संस्थान चे प्रमुख मडालेश्वर स्वामी हसानंद तीर्थ महाराज,सचिव राजु महाराज सर्वच मंदिर संस्थान चे सदस्य व पुजारी,प्रशिक्षक बालक आणि भक्त भाविक यांचे सहकार्य लाभले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध