Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १४ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन मेटे यांच्या मृत्यूनंतर काही नेत्यांनी अपघाताबाबत शंका
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन मेटे यांच्या मृत्यूनंतर काही नेत्यांनी अपघाताबाबत शंका
विनायक मेटेंच्या गाडीचे चालक एकनाथ कदम यांचा जबाब पोलीस नोंदवणार आहेत.एकनाथ कदम यांची रसायनी पोलिसांकडून चौकशी सुरू आहेत.पोलिस चालकाकडून अपघाताचा तपशील पडताळून पाहणार आहेत.आता ड्रायव्हरला रसायनी पोलीस घेवून गेले आहेत. रसायनीमध्ये त्याची मेडिकल करण्यात येणार आहे.विनायक मेटे यांचा अपघात झाला त्या ठिकाणच्या आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस चेक करणार आहेत.गाडीला अपघात होण्याच्या आधीची वेळ आणि अपघाता नंतरची वेळ तपासली जाणार आहेत.अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणाहून गेलेल्या गाड्यांना कोणत्या प्रकारचे अपघाताचे निशान आहेत का? हे सीसीटीव्हीमध्ये तपासणार आहेत.
विनायक मेटे हे मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसले होते.पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला त्यांचा बॉडीगार्ड होता.मेटे यांची गाडी हायवेच्या मधल्या लेनमध्ये होती.10 चाकी ट्रक हा तिसऱ्या लेनला चालत होता.या ट्रकचालकाने तिसऱ्या लेनमधून मधल्या लेनमध्ये येणाचा प्रयत्न केला. यावेळी मेटे यांची गाडी वेगात होती. अचानक ट्रक मधे आल्यानं वेगानं मेटे यांची गाडी ट्रकला धडकली. चालकाला गाडी कंट्रोल करणं जमलं नाही.मेटे यांची गाडी डाव्या बाजूने ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली.मेटे यावेळी झोपेत होते,त्यामुळं त्यांना काही कळायच्या आत वेगाने धडक बसल्यानं डोक्याला मार बसला.यात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बराच वेळ मेटे यांना मदत मिळाली नाही.या अपघातानंतर ट्रकचालक हा फरार झाला आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून याची पाहणी करत आहेत. चौकशीसाठी 8 पथकं नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा