Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी,वाल्मीक नगर व गुरुदत्त कॉलनी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त माजी सैनिक सन्मान सोहळा संपन्न..!



शिरपूर प्रतिनिधी: शिरपूर शहरातील आर‌.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी,वाल्मीक नगर,गुरुदत्त कॉलनी यांचा संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त माजी सैनिक एस बी सोनवणे निवृत्त नाईक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर माजी सैनिक एस.बी.सोनवणे यांचा गौरव करण्यात आला.ध्वजारोहण कार्यक्रमासाठी तीनही शाळेचे मुख्याध्यापक गोपाल पाटील, रेखा सूर्यवंशी, गणेश साळुंके साळुंके, विद्यार्थी व पालक बंधू उपस्थित होते.
               
तीनही शाळेतील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना संस्था स्तरावर संकुलातील प्राथमिक शिक्षकांनी आपल्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या विविध स्वातंत्र्य सेनानींच्या जीवनपटावर आधारित असलेल्या ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आल्या.त्यानंतर विद्यार्थ्यांची स्वातंत्र्य सेनानी या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसेनानींच्या जीवनावर छान प्रकारे माहिती आपल्या भाषणातून सादर केली. विद्यार्थ्यांची भाषणे ऐकून श्रोते व प्रमुख पाहुणे प्रभावित झाले.परीक्षणाचे काम वैशाली सोनवणे, किशोर सोनवणे,चंद्रकांत सोनवणे यांनी पाहिले.व त्यांनी तीनही शाळेतून प्रत्येकी दोन गुणानुक्रम काढले.
         
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल न्हावी यांनी केले तर आभार स्नेहल शिंदे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध