Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २० ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा पोलीस निरीक्षक सुनिल भाबड यांचेकडून श्रीजी अभ्यासिकेस पाच हजारांच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारी पुस्तकांची भेट.
शिंदखेडा पोलीस निरीक्षक सुनिल भाबड यांचेकडून श्रीजी अभ्यासिकेस पाच हजारांच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारी पुस्तकांची भेट.
शिंदखेडा (यादवराव सावंत)प्रतिनिधी
शिंदखेडा येथील गेल्या पाच वर्षापासून कार्यरत असलेल्या श्रीजी अभ्यासिकेची गूणवत्ता आणि उपयूक्तता पाहून पोलीस निरीक्षक सूनिल भाबड यांनाही या अभ्यासिकेस मदत करण्याची इच्छा झाली.त्यानूसार त्यांनी आज सूमारे पाच हजार रूपये किमतीची स्पर्धा परीक्षेला उपयूक्त असणारी पूस्तके अभ्यासिकेस भेट दिली.
यावेळी उपस्थित विध्यार्थ्याना त्यांनी स्पर्धा परिक्षेविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या शालेय जीवनापासून ते पी.आय.होईपर्यंत आलेल्या सर्व बिकट अडचणी विध्यार्थ्याना सांगितल्या.
जिद्द,मेहनत आणि चिकाटी या तिन गूणांनीच स्पर्धा परीक्षेत यश मिळत असते.तरूणांनी या अभ्यासिकेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील नगरपंचायत विरोधी पक्षनेते सुनील चौधरी सुनील चौधरी आणि मुंबई पोलीस प्रल्हाद चौधरी यांनी ही अभ्यासिका २०१७ मध्ये सुरू केली. अभ्यासिका पूर्णपणे निःशुल्क असून सर्व सुविधा पुरवल्या जात आहे.गेल्या चार वर्षापासून अभ्यासिकेचा लाभ घेतलेल्या पैकी पंधरा विद्यार्थ्याची विविध शासकीय सेवेत निवड झाली आहे.
अभ्यासिकेमध्ये एक हजाराहून अधिक विविध विषयांची पुस्तके उपलब्ध आहेत.अभ्यासीकेची क्षमता तीस विद्यार्थ्यांची आहे.विद्यार्थ्यांना शूद्ध पाणी,बसण्याची व्यवस्था पुरवली जात आहे.या शिवाय उन्हाळ्याच्या दृष्टीने या अभ्यासिकेत एयर कंडीशन बसवण्यात आला आहे. रोज २० ते २५ विद्यार्थी या अभ्यासिकेचा लाभ घेतात.
प्रत्येकाला ओळखपत्र देण्यात आले आहे.
सकाळी आठ वाजेपासून रात्री अकरापर्यंत अभ्यासिकेच्या टाईम आहे. लवकरच अभ्यासिकेत कम्प्युटर आणि इंटरनेट ची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे चौधरी बंधूंनी सांगितले. याशिवाय सध्या ही अभ्यासिका केवळ मुलांसाठीच आहे मात्र येणाऱ्या काळात लवकरच मुलींसाठी सुद्धा अभ्यासिका सुरु करण्यात येणार आहे.
अभ्यासिकेच्या लाभ घेणाऱ्या पैकी आतापर्यंत १५ विद्यार्थी वनरक्षक,आर्मी,पोलीस,एयरफोर्स ,
गृहरक्षक दल, ऑर्डनन्स फॅक्टरी ठाणे, जिल्हा न्यायालय या क्षेत्रात त्यांचे नोकरीसाठी निवड झाली आहे.सदर विद्यार्थी अभ्यासिके बाबत प्रत्यक्ष भेट देवून आजही कृतज्ञता व्यक्त करतात.
अभ्यासिकेत विविध कार्यक्रही घेतले जातात.अशाच काही कार्यक्रमांसाठी पोलीस निरीक्षक भाबड यांनी अभ्यासिकेत भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.
शिंदखेडा सारख्या शहरात तरूणांसाठी ही श्रीजी अभ्यासिका वरदान ठरणारी आहे अभ्यासिकेचा उपयोग खरोखरच विद्यार्थी घेत आहेत.काहींना त्यांचा लाभ झाला..चांगल्या कामात आपलेही काहीतरी योगदान असावे ही मदतीमागची भावना आहे.विरोधी पक्षनेते नगरपंचायत सुनील चौधरी व मुंबई पोलीस प्रल्हाद चौधरी यांच्या कार्याचा मनापासून त्यांचे आभार मानतो.
पोलीस निरीक्षक सूनिल भाबड.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी प्रतिनिधी - मुकेश लोढा वणी येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भागात करण्यात आलेल्या गटार पाईपलाई...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा