Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२
खर्दे विद्यालयात अमृत महोत्सव निमित्त पथनाट्याचे सादरीकरण
शिरपूर प्रतिनिधी:तालुक्यातील खर्दे येथील आर.सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सुरुवातीला ध्वजारोहण समारोह इयत्ता बारावी या वर्गात शाळेत व तालुक्यात प्रथम आलेली विद्यार्थिनी कु.सीमा भगवान पाटील हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.नंतर पथनाट्यांचे सादरीकरण गावातील चौका चौकात करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच सविताबेन पटेल, माजी सरपंच रवींद्र गुजर, उपसरपंच नितीन चौधरी, पोलीस पाटील सुरेश सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती जाधव, प्राचार्य पी.आर.साळुंखे आदि मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयातील प्राचार्य पी.आर.साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान वरील विविध प्रसंग पथनाट्यातून गावातील चौका चौकात सादरीकरण करण्यात आले.पथनाट्य पहात असताना इंग्रजांनी भारतीयांवर केलेले अन्याय पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावले. मिळालेल्या स्वातंत्र्याच्या रक्षणाची जबाबदारी आपणावर आहे असा संदेश पथनाट्यातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी. आर.साळुंखे तर सूत्रसंचलन ए जे पाटील व आभार प्रदर्शन अमोल सोनवणे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य पी.आर.साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.बी.धायबर,अमोल सोनवणे, हितेंद्र देसले,ए.जे.पाटील, पी.एस अटकळे, बी.एस.बडगुजर,बी .एस.पावरा, सुनीता सूर्यवंशी, सीमा जाधव,सुनंदा निकम,मनीषा पाटील, युवराज मिठभाकरे,राकेश पाटील यांनी प्रयत्न केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा