Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, १ ऑगस्ट, २०२२
आमोदे वि.का.सेवा सह सोसायटी चेअरमन,व्हाईस चेअरमन ची निवड बिनविरोध संपन्न..!
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील आमोदे वि.का.सेवा सह सोसायटी चेअरमन,व्हाईस चेअरमन ची निवड ही सर्व सदस्य व गटनेते व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आज दिनांक ०१ ऑगस्ट 2022 रोजी विविध सहकारी सोसायटीच्या कार्यालयात सकाळी १० वाजता बिनविरोध संपन्न झाली.
आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आमोदे वि.का.सेवा सह सोसायटी चेअरमन श्री प्रेमसिंह भीमसिंह राजपूत यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून सौ सुलोचना महारु देशमुख यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आले आहे.
आमोदे वि.का.सेवा सह सोसायटी ची स्थापना सन १९२४ रोजी स्थापन करण्यात आली होती तेव्हापासून सोसायटीने आपली विकासात्मक घोडदौड सुरू ठेवली असून आर्थिक प्रगती केली आहे.
सन 2002 मध्ये या संस्थेचे इमारतीचे भूमिपूजन होऊन सोसायटीच्या कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले. विशेष म्हणजे तेव्हापासूनच तालुक्याचे लाडके आमदार व माजी मंत्री मा. अमरीशभाई पटेल हे या सोसायटीचे सदस्य आहेत. मात्र या संस्थेने आजवर सदस्य व चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड सतत बिनविरोध पद्धतीने केली आहे. आणि आज देखील हीच परंपरा कायम ठेवत सोसायटीने आपले चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड सर्व संमतीने बिनविरोध केली आहे.
सदरच्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश जी चौधरी व संस्थेचे सचिव ए.व्ही.कुवर यांनी कामकाज पाहिले.
सदर पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यासाठी संस्थेचे सदस्य प्रवीणसिंह देशमुख यांनी प्रस्ताव मांडला व त्यास इतर सहकाऱ्यांनी अनुमोदन दिले. आणि चेअरमन व व्हाईस चेअरमन म्हणून फक्त दोनच अर्ज प्राप्त झाल्याने ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.
यावेळी संस्थेचे सदस्य मा.अमरीशभाई पटेल,पाटील दरबारसिंह काशिनाथ, देशमुख सुरेंद्र भटूसिंह,राजपूत प्रेमसिंग भीमसिंह, पाटील गोकुळ चिंधू ,प्रवीण चंद्रसिंग देशमुख ,राजेंद्र गुलाबसिंह देशमुख,नरवीर मंगलसिंह राजपूत, राज चंद्रसिंह देशमुख,थोरात सुनील काशिनाथ,संगीताबाई रणजीतसिंह देशमुख,सुलोचनाबाई महारू देशमुख इ सदस्य उपस्थित होते.
सदरच्या नवनिर्वाचित सदस्य चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे आमोदे गावाचे सरपंच सौ हर्षाली देशमुख यांनी स्वागत व सत्कार केला.सोबत नवनिर्वाचित सदस्यांच्या देखील स्वागत व सत्कार करण्यात आला.
निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पणे पार पाडण्यासाठी गटनेते जगदीश नाना देशमुख यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळेस रणजीतसिंह देशमुख, श्यामसिंह गिरासे ,मंगलसिंह देशमुख ,लक्ष्मणसिंह देशमुख ,कल्याणसिंग राजपूत, योगेंद्रसिंग राजपूत ,दरबारसिंग राजपूत, जगदीश पाटील, मानसिंग देशमुख ,यशपाल राजपूत, पृथ्वीराज राजपूत ,पिंटू राजपूत ,मधुकर देशमुख, सचिन राजपूत, पुनम राजपूत, विजय राजपूत, यासह गावातील इतर मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.यावेळेस गावकऱ्यांकडून फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा