Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १४ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
राज्याने मराठा अस्मितेचा भारदस्त व्यक्तीमहत्व स्व.विनायक मेटे यांचा रूपाने एक मोठा नेता हरपला
राज्याने मराठा अस्मितेचा भारदस्त व्यक्तीमहत्व स्व.विनायक मेटे यांचा रूपाने एक मोठा नेता हरपला
दिवसाची सुरुवात सकाळी विनायकराव मेटे यांच्या अतिशय धक्कादायक अशा अपघाती निधनाच्या बातमीने झाली.महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये,विशेषतः मराठवाड्यामध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व अत्यंत कष्टाने आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकसित केलेला नेता असा विनायकरावांचा परिचय महाराष्ट्राला होता.
ते राजकीय कार्यकर्ते कमी पण सामाजिक कार्यकर्ते अधिक होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असेल किंवा नव्या पिढीच्या शैक्षणिक सवलतींचा प्रश्न असेल अशा सगळ्या कामांमध्ये अत्यंत बारकाईने व अभ्यासूपणाने व्यक्त होणारे ते व्यक्तिमत्व होते.राज्य सरकार वा अन्य संस्था सुसंवाद ठेवण्याची त्यांची भूमिका होती.शिवछत्रपतींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईच्या समुद्रामध्ये व्हावे यासाठी त्यांनी कष्ट घेतले व अनेकांना आपली आग्रही भूमिका पटवून देण्याची खबरदारी घेतली.आजच्या आकस्मिक अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातल्या एका मोठ्या सामाजिक नेतृत्वाला आज आपण मुकलो.मी माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने या दुःखामध्ये सहभागी आहे.एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते आमचे सहकारी होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी काम केले.नंतर स्वतःचा पक्ष काढण्याची भूमिका त्यांनी घेतली. अशा एका जीवाभावाच्या सहकाऱ्याला आम्ही मुकलो.त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि हजारो कार्यकर्त्यांच्या दुःखामध्ये आम्ही स्पर्श शुगर मिल संचलित पांझरा कान साखर कारखान्याचे अध्यक्ष पवन मोरे साहेब यांचा सह सर्व पदअधिकारी स्व.मेटे साहेब यांचा कुटुंबियांचा दुःखात सहभागी आहोत. 💐💐🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली!
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा