Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ११ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
जैसी करनी वैसी भरणी:-शिंदखेडा तहसीलदार सुनील सैंदाणे यांचे जमिनीच्या फेरफारीचे अधिकार काढलेत
जैसी करनी वैसी भरणी:-शिंदखेडा तहसीलदार सुनील सैंदाणे यांचे जमिनीच्या फेरफारीचे अधिकार काढलेत
शिंदखेडा प्रतिनिधी:ता.१०शिंदखेडा तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी शिंदखेडा तालुक्यातील डांगुणें,सोंडले बाभळे येथील सरकारी जमिनीबाबतचा नजराणा स्व:अधिकाराने भरून घेतल्याने त्यांच्यावर निलंबनाचा प्रस्ताव महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शासनास सादर केला होता.दरम्यान , या प्रकरणी सैंदाणे यांचे वर्ग दोनच्या जमिनीबाबत व लेखन प्रमाद दुरुस्तीचे सर्वाधिकार काढण्यात आले असून , दोंडाईचा अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे यांच्याकडे कार्यभार देण्यात आहे.
तसेच शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे हे नियंत्रण पर्यवेक्षण करणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.या बाबत 'जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आदेशात म्हटले आहे,की प्रशासकीय कारणास्तव ई -फेरफार प्रणालीमध्ये कामकाज करण्यासाठी
तहसीलदार सैंदाणे यांना असलेले अधिकार काढण्यात येऊन सदर अधिकार अपर तहसीलदार आशा गांगुर्डे यांना तसेच गाव नमुना क्रमांक १ क मधील नियंत्रित सत्ता प्रकाराच्या शेतजमिनीबाबतचे कामकाजाचे उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांना देण्याबाबत प्रस्तावित आहे.
नियंत्रित सत्ता प्रकाराच्या
शेतजमिनीबाबतचे कामकाज करण्यासाठी ई -फेरफार प्रणालीमध्ये फक्त तहसीलदार यांचा एकच थंबचा बायोमेट्रिक रजिस्ट्रेशनचा पर्याय असून दोन स्वतंत्र टॅब नसल्याने व ई -फेरफार प्रणालीमध्ये उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे व अपर तहसीलदार आशा गांगुर्डे यांना एकत्रितपणे सदरचे काम करता येणार नाही.त्यामुळे फक्त शिंदखेडा तालुक्यासाठी स्वतंत्र टॅबची सुविधा देण्याबाबत अलाहिदा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.
नियंत्रित सत्ता प्रकाराच्या शेतजमीनीबाबतचे तहसीलदार सैंदाणे यांचे ई -फेरफार प्रणालीमध्ये कामकाज करण्याचे अधिकार तात्पुरत्या स्वरूपात अपर तहसीलदार आशा गांगुर्डे यांना पुढील आदेशापर्यंत प्रदान करण्यात येत आहेत.अप्पर तहसीलदार गांगुर्डे यांनी ई -फेरफार प्रणालीमध्ये नमुना क्रमांक १ क मधील नियंत्रित सत्ता प्रकाराच्या कोणतेही कामकाज शेतजमीनीबाबतचे फेरबदल / बदल / आदी केल्यानंतर त्याबाबतचा प्रकरण निहाय सविस्तर अहवाल शिरपूर उपविभागीय अधिकारी यांना तत्काळ सादर करावा,असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी आदेशात म्हटले आहे.
वरील सर्व घडलेला प्रकार पाहता सुनील सेनानी यांच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण मन जशी तशी लागू होते जैसी करनी वैसी भरणी
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा