Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ११ सप्टेंबर, २०२२
कोणती तपास न करता जिल्ह्यातील रेशन दुकानांना आय.एस.ओ मानांकन कसे?
तरुण गर्जना वृत्तपत्र:आय.एस.ओ. मानांकन प्राप्त करण्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या सर्व बाबींची पूर्तता करणाऱ्या अशाच दुकानांना आय.एस.ओ.मानांकन दिली जाते.मात्र जिल्ह्यात शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील रेशन दुकानांना त्यांची गरजच काय? खरे पाहता हे दुकाने शासने पुरवठा केलेले धान्य वितरण करण्याचे काम करते.म्हणजेच ही दुकाने फक्त आलेले अन्नधान्याचे वाटप करणे यासाठी आठवड्यातून जवळपास फक्त चार ते पाच दिवस उघडे असतात तरीदेखील या दुकानांना आय.एस.आय
मानांकनाची गरज काय? वेळेवर धान्य उपलब्ध नसते,धान्याची गुणवत्ता नसते, प्राप्त झालेल्या धान्यात दुकानावर येताना घट झालेली असते.म्हणजे प्रत्यक्ष दुकानावर येतानाच येणारा कट्टा (धान्याची गोणी) ही 50 किलो वजनाची नसतेच.तरी देखील हा दुकानदार ते धान्य सर्व ग्राहकांना कसा बसा करून पुरवतो.हे फक्त त्यालाच माहिती असते.शासनाच्या जवळपास ९०-१०० अटी शर्तींची पूर्तता झाल्यावरच आयएसओ मानांकन दिले जाते.तसेच याची तपासणी तहसीलदार अथवा प्रांत अधिकारी अशा वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत त्याची कसून तपासणी झाल्याशिवाय आय एस ओ मानांकन देता येत नाही.मात्र जिल्ह्यात काही रेशन दुकानांना कोणतीही तपासणी न घेता,दिलेल्या अटी शर्तीची पूर्तता होते किंवा नाही याची कोणतीही चौकशी न करता आयएसओ मानांकन देण्यात आलेले आहे.
तरी या रेशन दुकानांची नावे उघड करून त्यांचा अहवालाची प्रत संबंधित दुकानावर ग्राहकांना पाहण्यास मिळावी.खरोखर आयएसओ मानांकन देताना त्या दुकानाच्या अटी शर्ती पूर्ण झाल्यात की नाही याची माहिती ग्राहकांमार्फत नक्कीच समोर येतील. आणि कोणती चौकशी न करता आय. एस.ओ. मानांकन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर अशी दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करता येईल.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा