Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
डिजिटल मिडीयातील पत्रकारांना अधिस्विकृती देणे सुरु मराठी पत्रकार परिषदेकडून या उपक्रमाचे स्वागत
डिजिटल मिडीयातील पत्रकारांना अधिस्विकृती देणे सुरु मराठी पत्रकार परिषदेकडून या उपक्रमाचे स्वागत
मुंबई- केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका द्यायला सुरूवात केली आहे.. मनी कंट्रोल डॉट कॉम या युट्यूब चॅनलच्या सहसंपादक सुमी दत्ता याच्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत.ही डिजीटल मिडीयातील पत्रकारांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी असून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष शरद पाबळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती देण्याबाबत पीआयबीने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी एक नियमावली तयार केली..त्या नियमावलीचा आधार घेत सुमी दत्ता यांनी अधिस्वीकृतीसाठी अर्ज केला होता..२२ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत सुमी दत्ता यांचा अर्ज मंजूर केला गेला..आता त्यांना अधिस्वीकृती मिळाली आहे.
महाराष्ट्रात देखील डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती देण्यासाठी नियमावली तयार करावी आणि डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती दिली जावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने यापुर्वीच केली आहे..पीआयबीच्या नियमांचा हवाला देत मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषद आता त्याचा पाठपुरावा करत राहतील..नव्या बदलाला आज विरोध होत असला तरी सर्वांनाच हे बदल स्वीकारावे लागतील..डिजिटल मिडियातील पत्रकारांना संघटीत करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने डिजिटल मिडिया परिषद हे नवं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे..डिजीटल मिडीयाच्या पत्रकारांनी मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजीटल मिडीया परिषदेशी जोडून घ्यावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
गो. पि. लांडगे,
प्रसिद्धी प्रमुख, अ.भा. मराठी पत्रकार परिषद- धुळे, नंदुरबार.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा