Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

सुनिल सौंदाणे यांच्या गैर कारभाराची प्रकरणे एकामागून एक उघड, जैसे ज्याचे कर्म तैसे फ़ळ देतो ईश्वर !



शिंदखेडा तहसिलदार वादग्रस्त कामकाजासाठी प्रसिध्द असलेले सुनिल सौंदाणे यांच्या गैरकामकाजाचे एकामागून एक प्रकरण समोर येत आहेत.यापुर्वी शिंदखेडा तालुक्याती कलमाडी येथिल वादग्रस्त जमिन प्रकरण, त्यानंतर इनामी जमीन गट क्र. ३४६ फ़ेरफ़ार प्रकरण,अजून शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे,सोंडले,बाभळे  येथिल सरकारी जमिनी बाबतचा नजराणा स्व:अधिकाराने भरुन घेतल्या प्रकरणी त्यांच्यावर चालूच महिन्यात निलंबनाची कारवाई झालेली असतांनाच त्यांच्य गैर कामकाजाचे अजून एक प्रकरणाने डोके वर काढले आहे.  

शिंदखेडा नगरपंचायतीच्या नावे असलेली मोकळी जागा तहसिलदार यांच्या निवासस्थानासाठी राखीव ठेवण्याबाबत तलाठी यांना आदेशित करून तशी तलाठी नोंद सातबारा उताऱ्यावर घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगरपंचायतीने शिंदखेडा नगरपंचायतीच्या तसा ठराव दिला नसतानाही तहसिलदार सुनिल सौंदाणे यांनी हा अजब कारभार केल्याचे निदर्शनास आले आहे.शहरातील नविन वसाहतीत आदर्श कॉलनी परिसरातील गट नं . ४३९/१ अ हा बिनशेतीकडे रहीवास कामासाठी वर्ग झाला असून यात ८७००५ चौमी जागा खुली जागा म्हणून राखीव ठेवली असुन ही जागा शिंदखेडा नगरपंचायतीच्या नावे असतांना तहसिलदार सुनिल सौंदाणे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन नगरपंचायतीची कुठलीही संमती नसतांना दि. ८ जून रोजी आदेश काढून संबंधित जागेपैको ३७२०० चौमी जागा तहसिलदार यांचे शासकीय निवासस्थानासाठी राखीव जागा ठेवण्याबाबत आदेशीत केले.त्यानुसार तलाठी यांचेकडील सातबरा उताऱ्यावर नोंद करण्यात आली असून अशी जागा देतांना त्या भागातील नागरीकांची देखील संमती असणे आवश्यक आहे . 

याबाबत नगरपंचायतीच्या ठराव करुन त्याबाबत आदेश करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांचे असतांनाच तहसिलदार यांनी तसे अधिकार वापरल्याने पुन्हा एक नविन प्रकरण तहसिलदार सुनिल सौंदाणे यांचे समोर आले आहे.याबाबत नागरीकांनी आ.जयकुमार रावल यांना निवेदन दिले असुन ही नोंद रद्द करण्याची मागणी केली आहे.याबाबत आ.रावल यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना कार्यवाही करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.प्रशांत बिडकर ,मुख्याधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित खुली जागा नगरपंचायतीच्या नावावर आहे.नगरपंचायतची परवानगी न घेता जागा नावावर करून घेतली आहे . 

मागील महिन्यात तहसिलदार यांनी या जागेत बांधकामासाठी परवानगीकरीता पत्र दिले होते.परंतु खुली जागा डी.पी प्लॅनमध्ये तहसिलदार यांच्या शासकीय निवासस्थानासाठी राखीव नसल्याने बांधकामासाठी परवानगी देता येत नाही.

सुनिल सौंदाणे यांचे एकामागून एक प्रकरण समोर येत असल्याने, असे कितीतरी प्रकरणे असून शकतील, की जे अजून समोर आलेले नाहित त्यामुळे सुनिल सौंदाणे यांच्या संपुर्ण शिंदखेडा तहिलदार पदातील कारकिर्दीतील हाताळलेल्या सर्व प्रकरणाची एकदा कसून चौकशी व्हावी.असे शिंदखेडा परिसरातील नागरीकांची मागणी जोर धरत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध