Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२
नंदुरबार प्रतिनिधी - दिनांक 28/09/2021 रोजीचे सायंकाळी 05.00 ते दिनांक 29/09/2021 रोजीचे सकाळी 10.00 वा.दरम्यान धडगांव येथील पोस्ट ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप तोडून ऑफिसमधील 15,500/- रुपये किमतीचे CPU, मॉनीटर, माऊस, की-बोर्ड व बार कोड स्कॅनर असा मुद्देमाल चोरी झाल्याने श्री.राजाराम सुरसिंग सोनी वय-56 वर्षे रा.वरुळ कानडी ता.शहादा जि. नंदुरबार यांनी दिलेल्या तक्रारीवरून धडगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 369/2021भा.द.वि.कलम 457,380,34 प्रमाणे दिनांक 29/09/2021 रोजी अ सात आरोपीताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात आरोपी नामे 1) योगेश्वर ऊर्फ भुया केशवलाल चव्हाण वय-32 2) विक्रम ऊर्फ विक्या रोहिदास पावरा वय-22 दोन्ही रा.वडफळ्या ता. धडगांव जि. नंदुरबार 3) निलेश धना वसावे वय 19 रा. वरखेडी ता. धडगांव जि. नंदुरबार यांना दिनांक 01/10/2021 रोजी तात्काळ अटक करुन आरोपींच्या ताब्यातून 2500/- रुपये किमतीचे एक मॉनीटर,की-बोर्ड व एक माऊस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.
धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेंद्र भुमा जाधव यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते.तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपींविरुध्द दोषारोपपत्र मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, धडगांव श्री. दीपक कंखरे यांचे न्यायालयात 48 दिवसातच सादर केले होते.
मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, धडगांव यांनी साक्षीदारांचे जबाब, पंच, आणि परिस्थितीजन्य पुरावे तपास अधिकारी यांची साक्ष यासर्व बाबींचा विचार करून आरोपी हे मा. न्यायालयीन कोठडीत असतांनाच खटला चालविण्याचे ठरविले (Under Trial). JMFC धडगांव श्री. दीपक कंखरे यांनी जलदगतीने खटला चालवुन खटल्याची सुनावणी पुर्ण करुन आरोपी 1) योगेश्वर ऊर्फ भुऱ्या केशवलाल चव्हाण वय 32 2) विक्रम ऊर्फ विक्या रोहिदास पावरा वय-22 दोन्ही रा.वडफळ्या ता.धडगांव जि. नंदुरबार 3)निलेश धना वसावे वय 19 रा. वरखेडी ता.धडगांव जि.नंदुरबार यांना 02 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर.पाटील, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. श्रीकांत घुमरे,धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.इशामोद्दीन पठाण यांचे मार्गदर्शनाखाली धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेंद्र भुमा जाधव यांनी केला असून मा. न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड.श्री.बी.आर.वळवी यांनी पाहिले होते.पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस अंमलदार समाधान केंद्रे यांनी कामकाज केले आहे.
तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच विशेष सरकारी वकील यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर.पाटील, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. श्रीकांत घुमरे यांनी अभिनंदन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा