Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

मुंबई येथे झालेल्या मास्टर हेअर कट, हेअर कलर्स स्पर्धेत योगेश महाले प्रथम



योगेश महाले यांचा सत्कार करताना मास्टर दीपक

शिरपूर प्रतिनिधी उंटावद : मुंबई येथे झालेल्या मास्टर हेअर कट, हेअर कलर क्लासेस सुरू होते.त्यांची स्पर्धा झाली यात शिरपूर येथील जय बालाजी एसी मेन्स पार्लरचे संचालक योगेश महाले यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
प्रशिक्षणानंतर एका स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत हेअर कलर आणि हेअर कट हे प्रदर्शन भरवण्यात आले.यात शिरपूर येथील जय बालाजी एसी मेन्स पार्लरचे संचालक योगेश महाले यांनी प्रथम क्रमांक पटकावला.चित्रपट अभिनेत्री श्वेता गुलाटी आणि केस तज्ज्ञ मास्टर दीपक यांनी योगेश महाले यांचा पुरस्कार देऊन गौरव केला.हा पुरस्कार आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे योगेश महाले म्हणाले.त्यांना नाभिक संघटनेचे शिरपूर येथील योगेश येशी यांचे मार्गदर्शन लाभले. अनिल सूर्यवंशी,महेंद्र येशी, कमलेश वारुडे यांनी त्यांचे स्वागत केले.
मुंबई येथे झालेल्या मास्टर हेअर कट, हेअर कलर्स स्पर्धेत योगेश महाले प्रथम




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध