Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे मुंबई आझाद मैदानावर लाक्षनिक धरणे आंदोलन



आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रतिनिधींचे मुंबई येथील आझाद मैदानावर सकाळी ११ वाजता लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे महत्वपूर्ण काम बघता त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावेत, कामाच्या मोबदल्याव्यतिरिक्त दरमहा ठराविक निश्चित मानधन लागू करण्यात यावे, आशा स्वयंसेविका अठरा हजार रुपये, गटप्रवर्तकांना पंचवीस हजार रुपये, किमान वेतन लागू करावे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे सेवानिवृत्तीचे वय निश्चित करून दरमहा त्यांना पेन्शन देण्यात यावी,शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मोबाईल पुरविण्यात यावेत,अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे भाऊबीज भेट लागू करावी.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिल्या जाणाऱ्या गणवेश, मोबाईल रिचार्ज आणि सदिल खर्चाच्या रकमेत वाढ करण्यात यावी.यासह अन्य प्रमुख प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.१७ ऑक्टोबर सोमवारी संघटनेच्या पदाधिकारी, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

तरी धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुबंईकडे रवाना झाले आहे.यात माया परमेश्वर,युवराज बैसाणे,रामकृष्ण बी.पाटील, सुधीर परमेश्वर,अमोल बैसाणे,दत्ता जगतापसह सर्व जिल्हा व तालुका प्रतिनिधी सहभागी झाले आहेत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध