Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर बनावट स्टॅम्पचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर



मुंबई प्रतिनिधी:मुंबई, निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे.यानंतर उद्धव ठाकरेंना झटका देणारी आणखी एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर बनावट स्टॅम्पचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.मुंबई क्राईम ब्रांचने यासदर्भात मोठी कारवाई केली आहे.उद्धव ठाकरेंसाठी हा आणखी मोठा धक्का मानला जात आहे.
 मुंबई क्राईम ब्रांचने मुंबईत एक मोठी कारवाई केली.यावेळी पोलिसांनी वांद्रे, माहिम परिसरात धाड सत्र राबवले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्र हस्तगत केली आहेत.

शिवसैनिकांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर केल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान उघडकीस आली आहे.
ठाकरेंना पाठिंबा देताना प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली.या प्रतिज्ञा पत्रांसाठी बनावट आयकार्डचा वापर करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध