Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिक्षणधिकारी ( माध्यमिक) जिल्हा परिषद धुळे यांच्यावर प्रशासकिय कारवाही करा..! राज्य माहिती आयुक्ताचा आदेश..!
शिक्षणधिकारी ( माध्यमिक) जिल्हा परिषद धुळे यांच्यावर प्रशासकिय कारवाही करा..! राज्य माहिती आयुक्ताचा आदेश..!
अंबादास सुकदेव पवार माहिती अधिकार कार्यकर्ता शेगांव जि. बुलढाणा यांनी माहितीचा अधिकाराअंतर्गत जन माहिती अधिकारी तथा उपशिक्षणधिकारी माध्यमिक जि.प धुळे यांच्याकडे दिनांक14-2-2020 रोजी अर्ज करुन केन्द् पुरस्कुत अंपग एकात्मिक शिक्षण योजना व अंपग समावेशित शिक्षण योजनेमधील भ्रष्ट्र कारभाराबाबत चौकशी करुन दोषी विरुध्द फौजदारी कार्यवाही करण्याबाबत शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी दिलेल्या आदेशान्वये कार्यालयाने सादर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आर.टी.आय लोगोसह मिळण्याबाबत माहिती मिळण्याची विंनती केली होती.
त्यावर जनमाहिती अधिकारी तथा उपशिक्षणधिकारी माध्यमिक यांनी विहीत मुदतीत माहिती दिली नाही.व कोणताही प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे दिनांक 14-3-2020 रोजी प्रथम अपिल दाखल केले माञ शिक्षणधिकारी माध्यमिक जि.प धुळे यांनी अपिल निकाली काढलेच नाही.त्यामुळे पवार यांनी दितीय अपिल दाखल केले.राज्य माहिती आयोग नाशिक खंडपिठ यांच्याकडे सुनावणीच्या दरम्यान प्रथम अपिलीय अधिकारी तथा शिक्षणधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे हे सुनावणीला गैरहजर होते त्यामुळे आयोगाने या प्रकरणी गंभीर दखल घेवुन सामान्य प्रशासन विभागाचे परिपञक प्र.क्र.(222/15) सहा. दिनांक 1-12-2015 नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.धुळे यांनी कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तिस दिवसाच्या आत आयोगास सादर करावा असे आदेशात नमुद आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा