Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना ने सार्वजनिक बांधकाम विभाग शिरपूरला खर्दे उंटावत, सावळदे ते गिधाडे महामार्गाचे सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिवसैनिकांनी धरले धारेवर.
शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना ने सार्वजनिक बांधकाम विभाग शिरपूरला खर्दे उंटावत, सावळदे ते गिधाडे महामार्गाचे सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिवसैनिकांनी धरले धारेवर.
शिरपूर प्रतिनिधी:महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या प्रयत्नाने शहराध्यक्ष हेमंत पाठक तसेच जावेद शेख यांच्या माध्यमातून
शिरपूर तालुक्यातील खर्दे शिवारात म्हणजेच खरेदे बुद्रुक- उंटावत - सावळदे शिवार तसेच गिधाडे येथील रस्ता पावसाळ्यात फार खराब झालेला आहे यामुळे नागरिकांना रहदारी करायला फार त्रासदायक होत आहे.
अनेक अपघात घडत आहेत.अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले असून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग शिरपूर सुस्त अवस्थेत असून या रस्त्यांच्या बाबतीत निष्क्रिय आहेत. याचा एक भाग म्हणून महाराष्ट्र वाहतूक सेना शिरपूरच्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम विभाग शिरपूर येथील अधिकाऱ्यांना निवेदन दिले, पाच दिवसाच्या आत ही खड्डे भरले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांना जागृत करून त्या ठिकाणी वृक्ष लागवड करून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेकडून देण्यात आला.याची सगळी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे असेल याची देखील माहिती दिली.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत,एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख राजू टेलर, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष (धुळे ग्रामीण) जितेंद्र पाटील, उपजिल्हा युवा अधिकारी अनिकेत जी बोरसे, महाराष्ट्र वाहतूक सेना शहर अध्यक्ष हेमंत पाठक, युवा सेनेचे उपतालुका अधिकारी जितेंद्र राठोड, पिंटू शिंदे,वाजिद मलक,विजय चव्हाण, गणेश बिरारी, दिनेश गुरव शोएब मनियार , अरबाज शेख, दानिश शेख, अविनाश गुंजार, समीर शेख, सोनू शेख, शहीद शेख आधी शिवसैनिक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा