Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
सक्षम समाजनिर्मितीसाठी अहवानात्मक अभ्यासक्रम निर्मितीची आवश्यकता..!- प्रा.डॉ. नारायण कांबळे
सक्षम समाजनिर्मितीसाठी अहवानात्मक अभ्यासक्रम निर्मितीची आवश्यकता..!- प्रा.डॉ. नारायण कांबळे
अहमदपूर प्रतिनिधी: गजानन आनंतवाळ:समकालीन समाजातील प्रश्न,समस्या याचा अभ्यास करून सोबतच नविन अहवानाचा अभ्यासात समाविष्ट करणे आवश्यक आहे. तरच समाजात नव्याने परिवर्तन घडवून आणले जाईल असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत तथा समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डाॅ.नारायण कांबळे यांनी केले.
विद्यापीठाच्या समाजशास्त्र विषयात अंधश्रध्दा निर्मूलनाचा विषय अभ्यास क्रमात समाविष्ट केल्या बद्दल
येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. नारायण कांबळे यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला होता या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ. भूषणकुमार जोरगुलवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. गोविंदराव शेळका,मोहसिन बायजीद,प्रकाश गादगिने,अशोक चापटे,प्रा.द.मा.माने,डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी पूढे बोलताना प्रा.डाॅ.नारायण कांबळे म्हणाले की,डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी केलेला त्याग कधीही न विसरणार असून तो कायम तेवत ठेवण्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून बीए च्या विद्यार्थ्यांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विवेकी चळवळीचा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करून परंपरेला छेद देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नवनिर्माण समाज निर्मिती झाली पाहिजे.चळवळीचा विषय प्रत्येक वर्षी चार हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात रुजवला जाणार आहे.
या प्रसंगी जस्ट विचारवंत डॉ.भूषणकुमार जोरगुलवार अध्यक्ष समारोप करताना अंधश्रद्धा म्हणजे स्वतःची बुद्धी घाण ठेवणे व येणाऱ्या काळामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हा तळागाळापर्यंत रुजवणे गरजेचे असून ग्रामीण भागात व महाविद्यालयातील विद्यार्थी व तरुण पिढीच्या खांद्यावर मोठी ही जबाबदारी आहे.आणि शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांचे काम एका शतकामध्ये होणे शक्य नाही.प्रत्येक चमत्कारा मागे विज्ञान आहे.
जादू नाही हे याच्या तळाशी जाणे गरजेचे आहे. आठवड्यातून एकदा उपास करणे घरासमोर तुळशी वृंदावन असणे याच्या पाठीमागे विज्ञान जोडलेले आहे.याची माहिती अजूनही नाही.अंधश्रद्धा दूर करणे हे तुमची माझी मोठी जबाबदारी आहे असे यावेळी आपले भावना व्यक्त केल्या.प्रा गोविंद शेळके,प्रकाश गादगीने, रामभाऊ तत्तापुरे, प्राअशोक चापटे,डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.रत्नाकर नळेगावकर तर सूत्रसंचालन मेघराज गायकवाड यांनी केले.या वेळी अंनिसचे अध्यक्ष डॉ.धीरज देशमुख,मोहिब खादरी, चंद्रशेखर भालेराव, इमरोज पटवेकर,प्रा. अतुल पागे,भागवत येणगे,शेषराव ससाणे, सुजित गायकवाड,नाना साहेब कदम, अशोक मिरदोडकर. धर्मपाल सरवदे,विरेंद्र पवार,मिलिंद गोदाम आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे अभार पत्रकार सुरेश डबीर यांनी मानले.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.........अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रा डॉ नारायण कांबळे यांचा सत्कार करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ भूषणकुमार जोरगुलवार डॉ धीरज देशमुख. मोहसीन बायजीद.प्रा गोविंद शेळके. अशोकराव चपटे.प्रकाश गादगीने. मेघराज गायकवाड .प्रा रत्नाकर नाळेगावकर.....
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा