Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२

पाेलिस पाटलांचे प्रश्न जातीने साेडविणार पालकमंत्री : ना.गिरीष महाजन



शिरपुर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात पाेलिस पाटील प्रशासनाची पहिली पायरी आहे. कायदा,सुव्यवस्थासह, गावात आपत्ती काळात पाेलिस पाटील नेहमी प्रशासानाला मदत करताे.  मी स्वता ग्रामीण भागात काम करत असतांना पाेलिस पाटील यांच्या प्रामाणिक कामाचे अनेक अनुभव घेतले आहेत.राज्यांचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाेलिस पाटील यांचे प्रश्न मी स्वता मांडणार आहे. 


तर लवकरच आपले प्रश्न मार्गी लागतील.आपण सर्वांनी निच्यिंन्त रहावे. आपले काम करावे. शासन आपणास याेग्य ताे न्याय देणार आहे. अशी ग्वाही पाेलिस पाटील यांच्याशी औपचारिक चर्चा करतांना धुळ्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. 
    
राज्याच्या मंत्रीमंडळात जामनेर विधानसभेचे आमदार गिरीष महाजन तसेच नंदुरबार विधानसभेचे आमदार विजयकुमार गावीत यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मंत्रीद्वयींचा शिरपुर तालुका व शहराच्या वतीने काल दुपारी १२ वाजता आर. सी. पटेल फार्मसीच्या पटांगणात सत्कार साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी शिरपुर तालुका पाेलिस पाटील संघनेच्या वतीने ना. गिरीष महाजन यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

निवेदनात पाेलिस पाटील यांचे मानधन दरमहा १५००० (पंधरा हजार रूपये) करण्यात यावे. पाेलिस पाटील कल्याण निधी वेगळा भरून पेन्शन लागू करावे. निवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करावे. महाराष्ट्र पाेलिस कुंटुब आराेग्य याेजनेत पाेलिस पाटीलांना समाविष्ट करून लाभ द्यावा. महाराष्ट्र राज्य पाेलिस पाटील अधिनियम १९६७ मध्ये सुधारणा करावी.नुतनीकरण कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. विमा संरक्षण मिळावे.अतिरिक्त गावाचा पदभार सांभाळणाऱ्या पाेलिस पाटीलांना अतिरिक्त माेबदला मिळावा. प्रवास भत्ता अदा करण्यात यावा. गुन्हा दाखल झाल्यास काेर्टाचा निकाल लागेपर्यंत निलंबित करण्यात येवु नये. यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.निवेदनावर पिंप्रीचे पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे, खर्दे खु।।चे पंकज पाटील, ताजपुरी दिपक सनेर, चांदपुरी साै.शिला पाटील, बाभुळदे महेंद्र दाेरीक, बाेरगांव मनाेहर पाटील, जाताेडा भरत बागुल, खर्दे बु।। सुरेश साेनवणे, उंटावद राजेंद्र सातकर, साकवद विठाेबा गाेसावी यांच्यासह तालुक्यातील विविध गावांचे पाेलिस पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

कॅप्शन : धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांना पाेलिस पाटील यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी निवेदन देतांना जयपालसिंह गिरासे, पंकज पाटील,दीपक सनेर,साै.शिला पाटील, महेंद्र दाेरीक, मनाेहर पाटील, भरत बागुल, सुरेश साेनवणे, राजेंद्र सातकर, विठाेबा गाेसावी आदी पाेलिस पाटील मित्र.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध