Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२

कहाटूळ गावातील शेतकऱ्यांना जैविक खते व औषधीचे मार्गदर्शन..!



शहादा प्रतिनिधी - तालुक्यातील कहाटूळ गावात नवभारत फर्टीलाझर्स ली.तर्फे शेतकरी मेळावा घेण्यात आला व तेथील शेतकऱ्यांना जैविक खते व औषधीचे मार्गदर्शन करण्यात आले.. व आज दिवसेंदिवस आपण जमिनीची अती रासायनिक खते व औषधी टाकल्या मुळे शेती मध्ये होणारी घट व मानवी शरीराला होणारे नुकसान कमी करण्यासाठी नवभारत फर्टीलाझर्स ली. चे आधिकरी उमेश निकस यांनी दि. 28 / 9 / 2022 रोजी शहादा तालुक्यातील कहाटूळ येथे शेतकरी मेळाव्यात जैविक खते व सेंद्रिय शेती बदल मार्गदर्शन केले.

तसेच कंपनीचे अधिकारी उमेश निकस यांनी शेतकऱ्याची जमीन भुसभुसीत करण्यासाठी तसेच पोत सुधारण्यासाठी जमिनीची आद्रता भरुन काठण्यासाठी व शासनाच्या म्हणण्यानुसार जैविक शेतीला जास्त प्राधान्य देण्यात येणाऱ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी नवभारत फर्टीलाझर्स ली.गेल्या 25 वर्षापासून शेतकऱ्याच्या सेवेसाठी काम करत आहे.त्यामुळे आपण आज पासुन जैविक शेती कडे वळावे असे आश्वासन कंपनीचे अधिकारी DBM. चंद्रराव पाटील , ABM.पांडुरंग कोळी यांनी सांगितले की सेंद्रिय शेती हि पुढच्या पिढीसाठी काळाची गरज आहे. 

असा एक छोटासा प्रयत्न नवभारत फर्टीलाझर्स ली.कंपनी करीत आहे. व भविष्यात सुध्दा कंपनी कडून आशीच सेवा पुरवली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी मेळाव्यात गावाचे सरपंच अनिल भिला पाटील,पोलिस पाटील विजय दशरथ पाटील ,विजय दत्तू पाटील, रतिलाल पाटील ,कंपनीचे अधिकारी अतुल बाळू जाधव ,जगदीश सूर्यवंशी ,गोपाल पाटील ,मुकेश शिरसाट व कहाटूळ गावातील समस्त शेतकरी या मेळाव्यात उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध