Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२
अवाजवी घरपट्टी कर रद्द करणेबाबत शिरपूर भाजपा तर्फे नगरपरिषदेस निवेदन..!
शिरपूर प्रतिनिधी: शिरपूर भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा शिरपूरच्या वतीने शिरपूर वरवाडे नगर परिषदेस निवेदन देण्यात आले आहे कि,शिरपूर न.पा.तर्फे २० टक्के घरपट्टी करवाढ करुन नागरिकांना बीले अदा केली जात आहेत.शिरपूर शहराची परिस्थीती पाहता मागील काळात कोवीड महामारीमुळे आणि अतिवृष्टी अधिकचा पाऊस यामुळे शेतकरी,मजूर, दुकानदार, व्यापारी व सर्वसामान्य जनता आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे.व अडचणींच सामना करीत असतांना नागरिकांना घरपट्टी भाडेवाढ म्हणजे आर्थिक संकटात अधिकची भर पडली आहे.
तरी शिरपूर वरवाडे नगरपरिषद शिरपूर दर वर्षी १०० टक्के घरपट्टी वसूली भरणा करीत असतात.या गोष्टींचा विचार करुन शिरपूर न.पा.ने अवाजवी २० टक्के घरपट्टी भाडेवाढ रद्द करण्यात यावी असे निवेदन शिवनप चे मुख्याधिकारी तुषार नेरकर याना भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. निवेदनाची प्रत पालकमंत्री ना.गिरीष महाजन,उपविभागीय अधिकारी शिरपूर व तहसिलदार शिरपूर यांनाही पाठविण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शिरपूरच्या वतीने निवेदन देतांना भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, मुकेश पाटील, मोबीन शेख,संजय असापुरे, रोहित शेटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, रवींद्र राजपूत,नितीन गिरासे,श्रीकृष्ण शर्मा,अरविंद बोरसे, गिरीश सनेर, दिनेश कोळी, किरण कोळी,नागेश कोळी, गणेश माळी, शेखर कोळी मंगेश कोळी, अमोल लोणारी,राहुल परदेशी, रोहित कोळी, अतुल सोनार,राजेश धोबी,मनोज शिंपी, नागेश कोळी आदी पदाधिकारी आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा