Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

साक्री तालुका पंचायत समिती सभापती व उप सभापती पदाची आज निवडणूक प्रक्रिया पार पडली पुन्हा महाविकास आघाडी सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरलि सभापती पद कॉग्रेस चा तर उप सभापती पद शिवसेनेचा वाट्याला



साक्री : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीसाठी आज दि. 13 ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया घेण्यात आली. या निवडनुकीसाठी साक्री पंचायत समिती वर महाविकास आघाडीची सत्ता असल्याने सभापती पदासाठी श्री शांताराम कुवर व उपसभापती पदासाठी सौ माधुरीताई चंद्रकांत देसले यांची निवड करण्यात आली.या निवडणुकीसाठी पंचायत समितीच्या सभापती पदासाठी जिल्हाधिकार्यांनी यापूर्वीच आरक्षण जाहीर केले होते, त्यानुसार साक्री पंचायत समिती सभापती पदासाठी अनुसूचित जमाती असे आरक्षण जाहीर झाले होते.त्यानुसार सत्ताधारी महाविकास आघाडीकडुन सभापती पदासाठी काँग्रेसचे श्री शांताराम पोसल्या कुवर तर उपसभापती पदासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कासारे गणातील पंचायत समिती सदस्या सौ माधुरीताई चंद्रकांत देसले यांची निवड करण्यात आली, यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, कार्याध्यक्ष दिपक साळुंखे, शहराध्यक्ष सचिन सोनवणे, पं. स. सदस्य राजु महादु पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे,अमोल सोनवणे, तालुका प्रमुख पंकज मराठे, हिंमत साबळे, पंकज गवळी, अमोल ठाकरे आदि सह महा विकास आघाडीचे सर्व नेते मंडळी उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध