Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

नंदुरबार जि.प.उपाध्यक्षपदी सुहास नाईक यांच्या निवडीची शक्यता, सुप्रिया गावित आणि सुहास नाईक एकाच वाहनात आल्याने एकच चर्चा.



नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी भाजपाकडून डॉ.कुमुदिनी गावित,सुप्रिया गावित, राजश्री गावित यांनी तर काँग्रेसकडून सीमा वळवी, गीता पाडवी यांनी अर्ज खरेदी केले आहेत तर उपाध्यक्ष पदासाठी बाळासाहेबांची शिवसेनेकडून राम रघुवंशी, विजय पराडके यांनी उमेदवारी दाखल केली आहे. मात्र भाजपकडून उपाध्यक्ष पदासाठी सुहास नाईक यांच्या अर्ज खरेदी करण्यात आल्याने जिल्हा परिषदेवर सत्तंतराची दाट शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत काँग्रेसचे 24 भाजपाचे 20 राष्ट्रवादीचे चार बाळासाहेबांची शिवसेनेचे 6 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 2 असे पक्षीय बलाबल आहे. मात्र राष्ट्रवादीचे 4 सदस्यांनी यापूर्वीच भाजपाला समर्थन दिले आहे. मात्र, संख्याबळ जरी काँग्रेसकडे जास्त दिसत असले तरी गटबाजीमुळे तसेच फोडाफोडीच्या राजकारणामुळे जिल्हा परिषदेत सत्तांतर घडण्याची दाट शक्यता आहे.
मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुप्रिया गावित आणि सुहास नाईक हे एकाच वाहनात आले होते. शिवाय उपाध्यक्ष पदासाठी भाजपाकडून सुहास नाईक यांचा एकमेव अर्ज असल्याने उपाध्यक्षपदी त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध