Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २ ऑक्टोबर, २०२२

बापू




बापू तुम्ही 
देशाच्या विकासाचा श्री गणेशा खेड्यांपासून केला 
सोबत सगळयांना घेऊन खेड्यांकडे गेला 

बापू तुम्ही 
अहिंसेच्या काटेरी वाटेवर चालत गेला  
दुश्मनांच्या अंगाला घाम फोडीत गेला

बापू तुम्हांला 
उघडा-नागडा देश बघवता आला नाही
त्याच क्षणाला अंगावरचे वस्र त्यागून 
पुन्हा तुम्ही कधी 
अंगावर बॅरिस्टरचा कोट मिरवला नाही  

बापू तुम्ही 
मिठाच्या सत्याग्रहातून जिंकली लाखो लोकांची मने 
देशाचा हर एक माणूस ,
सैनिक होऊन उभा राहिला तुमच्या मागे

बापू 
देशाने तुमच्या कर्माचा सन्मान तुम्हांला दिला
तुम्हांला राष्ट्राचा पिता केला 
तुमच्या जयंतीला,देशाला सुट्टीचा आनंद दिला 

बापू 
देशाच्या चलनावरती 
सरकारी कामकाजावरती  
तुमचा फोटो आणि विचार शासन मान्य केला 


लक्ष्मण वाल्डे,कन्नड
मो.नं-8888606068



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध