Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २ ऑक्टोबर, २०२२

विनापरवाना शोरूम धारकांना विक्रीसाठी वाहन पुरवणारे अधिकृत शोरूम धारकांवर कारवाईची वाहनधारकांडून मागणी..!



अनाधिकृत टू व्हीलर शोरूम धारक विक्रेता विरुद्ध एका मागोमाग एक बातमी वृत्तपत्र तरुण गर्जना मधून सुरू झाल्यानंतर लुबाडले व फसवले गेलेल्या कितीतरी वाहनधारकांनी आमच्या प्रतिनिधीशी फोनवरून संपर्क साधून धन्यवाद व्यक्त केले.

त्याचबरोबर त्यांना आलेल्या समस्या वाहन खरेदीनंतर उत्पन्न झालेले प्रश्न व अडचणी याबाबत आमच्या प्रतिनिधी सविस्तर चर्चा केली.जिल्ह्यातील सर्वच अनाधिकृत टू व्हीलर शोरूम कायमचे बंद होणे गरजेचे आहे तसेच या अनधिकृत शोरूम धारकांना वाहने विक्रीसाठी पुरवणाऱ्या मुख्य परवानाधारक विक्रेत्याचा परवानाच रद्द करावा अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात  येत आहे.  



व यामुळे परवानाधारक शोरूम धारकांकडून त्यांच्या परवानाची प्रती आम्हाला व्हाट्सअप व मेलने देणे सुरू केले आहे.आमचे कोणतेही सब डीलर नाही,इतर कोणालाही विक्रीसाठी वाहने पुरत नाही.असे आमच्या प्रतिनिधीला सांगण्यात येत आहे.मंग ह्या शिरपूर तालुक्यात बजाज सुप्रभात मोटार्स,श्री दत्त होंडा व हिरो विमलनाथ ऑटोमोबाइल्स,नरडाणा येथील बजाज निर्मला मोटर्स.सोनगीर येथील हिरो सद्गुरु मोटर्स व प्रगती होंडा येथे वाहनांची विक्री करणाऱ्या ऑथोराइज्ड सर्विस सेंटर या नावाखाली वाहनांची खरेदी विक्री करून आपला गोरख धंदा सर्रास करतात यांच्या शोरूम मध्ये उभे असलेली वाहने नेमके आलेत कुठून? व कसे ? याचे उत्तर नेमकी आता कोण देणार ? यातच आमच्या प्रतिनिधीला माहिती देणाऱ्या व्यक्तीने असे  सांगितले की जिल्ह्यातीलच अधिकृत परवानाधारक हेच अनाधिकृत परवानाधारकांना वाहने पुरवतात यालाच म्हणतात " मी नाही यातली, कडी लाव आतली" असे नेमकी ही वाहने कुठून येतात? आणि कोणाची?  या सर्व प्रश्नांची उत्तरे परिवहन विभागाच्या आर.टी.ओ.अधिकाऱ्या कडून आम्ही मिळवणारच तोपर्यंत तरी शांतता नाहीच.आखिर बकरे की माँ कब तक खैर मनाएगी.अनाधिकृत शोरूम धारकांकडे विक्रीसाठी येणारी वाहने व विकली जाणारी वाहने यावर शासनाचा किती प्रमाणात टॅक्स  शासनात भरला जातो तो कोण भरतो व कोणाच्या नावाने भरला जातो याची सखोल चौकशी जीएसटी वसुली विभागाने करावी.तसेच शासनाचा जास्तीत जास्त कर व दंड या रूपाने वसूल मिळवून देण्यासाठी कोणताही प्रयत्न न करता अनधिकृत शोरूम धारकांवर आपला वरदहस्त ठेवला व त्यांना अभय दिले या कारणातून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी याची मागणी वाहनधारकांकडून व सुज्ञ नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.व याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात येत ‌आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध