Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

धुळे जळगाव,नंदुरबार जिल्ह्यातील आर.टी.ओ.चेकपोस्ट वरील दररोजची लाखोंमधील लुटमार पुन्हा एकदा चर्चेत..!



आरटीओ खात्यात मेंटेन केल्या जाणार्‍या ' भिकारी डायरीत;शिवाय दरमहाच्या पगाराप्रमाणे वाटल्या जाणाऱ्या पाकिटांच्या थप्पीत ! अशा भिकारी डायरीचे व पाकिटांच्या थप्प्यांचे चलन ज्या दिवशी बंद होईल त्यादिवशी चेकपोस्टवर धावा बोलणार्‍यांची गर्दी वाढेल चेकपोस्ट वरील कोट्यवधींचा प्रवाह थेट मुंबईपर्यंत वर - वर पर्यंतही वाहात असतो.त्यामुळे कितीही ओरड झाली तरी काहीच फरक पडत नाही.


कारण चेकपोस्ट वर ड्यूटी मिळविण्यासाठी वरूनच बोली लावून तो अधिकारी आलेला असतो.
मंत्रालयच भ्रष्ट्र असेल तर कारवाई कोण करणार? नवापूरचे गव्हाली , शिरपूरचे हाडाखेड चेकपोस्ट तर राज्यात सर्वात हेवी चेकपोस्ट पैकी एक मानले जाते.इथे अक्षरश: शेतकरी ज्याप्रमाणे पोत्यात दाबून - दाबून कपाशी भरतो त्याप्रमाणे गोण्यांमध्ये दाबून - दाबून ट्रकवाल्यांच्या नोटा भरल्या जातात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध