Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर, 8 चं दिवसांत लागणार आचारसंहिता,पहा संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर, 8 चं दिवसांत लागणार आचारसंहिता,पहा संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या 34 जिल्ह्यांतील 7751 ग्रामपंचायती, नवनिर्मित 8, तसेच गेल्या निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या 18 अशा एकूण 7751 निवडणुकांबाबत मोठं अपडेट समोर आलं आहे. या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.
आता या सर्व निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याबाबतचे सर्व आदेश राज्य निवडणूक आयोगाने संबंधित विभागला दिले असून एका नोटिसीद्वारे वेळापत्रक जाहीर केलं आहे.
त्यामुळे आता दिवाळीचे फटाके वाजल्यानंतर गावकीच्या कारभारावर मांड ठोकण्यासाठी प्रचाराचे फटाके महिनाभरात वाजणार असल्याने गावागावांत राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे.
असा असणार निवडणुकीचा कार्यक्रम.
राज्यातील 34 जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 28 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर 7 डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे अन् त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केलं जाणार आहे.
निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे तर 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानानंतर दोन दिवसानंतर म्हणजे 20 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातील 7751 गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. गावामध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे.
पहा निवडणुकांच्या तारखा. . .
तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याची तारीख :- 18 नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची तारीख :- 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर
अर्जाची छाननी होणारी तारीख :- 05 डिसेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख : 7 डिसेंबर
निवडणूक चिन्ह वाटपाची तारीख : 7 डिसेंबर दुपारी 3 नंतर…
मतदानाची तारीख : 18 डिसेंबर
मतमोजणी आणि निकाल : 20 डिसेंबर निकालाची अधिसूचना : 23 डिसेंबर जिल्हानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचातींची संख्या पहा. . .
बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140,
सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, एकूण – 7,751.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा