Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
श्रीरामपूरच्या दोन सराईत गुन्हेगारांना चोपड्यात गावठी कट्ट्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून घेतले ताब्यात..!
श्रीरामपूरच्या दोन सराईत गुन्हेगारांना चोपड्यात गावठी कट्ट्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून घेतले ताब्यात..!
चोपडा (प्रतिनिधी):-श्रीरामपूरच्या दोन सराईत गुन्हेगारांना चोपड्यात गावठी कट्ट्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे.दरम्यान,एक संशयित आरोपी मात्र,अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
या संदर्भात अधिक असे की, चोपडा येथे काही गुन्हेगारी वृत्तीची लोक गावठी कट्टा घेण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी दि.१३ नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास शिवाजी चौकात सापळा रचला. याठिकाणी एका कारमध्ये तीन जण संशयितरित्या आढळून आले.त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्या ४ गावठी पिस्तुल आणि १० जिवंत काडतूस मिळून आहे.
अधिक चौकशी केली असता राजेंद्र ऊर्फ पप्पू भिमा चव्हाण (वय ३२ रा. खंडाळा ता.श्रीरामपुर जि. अहमदनगर),गणेश ज्ञानेश्वर सातपुते (वय २३ रा.शिरसगाव ता.श्रीरामपुर जि.अहमदनगर) व पळून गेलेला आरोपी बबन ऊर्फ रोहित जाधव (रा. शिरसगाव ता.श्रीरामपुर जि. अहमदनर) अशी नावं सांगितली. विशेष म्हणजे या तिघांवर श्रीरामपुर तालुक्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे कळते.यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे दिपककुमार शिंदे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर चोपडा शहर पोलीस स्थानकात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५सह भादवि कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा