Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

ग्रामसेवक व सरपंच यांना गावातील विकासकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी ग्रामसभेत जितेंद्र पावरा यांनी केली....


 
शिरपुर प्रतिनिधी :- तालुक्यातील बुडकी ग्रामपंचायत येथे दि:-30/11/2022 रोजी ग्रामसभेची आयोजन करण्यात आले ग्रामसभेत जितेंद्र पावरा - महा.राज्य संघटक यांनी अर्जाव्दारे ग्रामसेवक व सरपंच यांना निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

या अर्जावर म्हटले आहे की, ग्रामपंचायत बुडकी अंतर्गत येणाऱ्या नवागांव (पाडा) साठी खासदार, आमदार,पेसा निधी,15 वा वित्त, रोजगार हमी, तसेच विविध शासकीय निधीतून सन 2023- 2024 च्या ग्रामपंचायतीच्या कृतीआराखडयात नवागांव (पाडा) गावातील कामाची दखल घेऊन समस्यांवर तोडगा काढण्यासाठी,व विकासकासाठी ग्रामपंचायतीने निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी जितेंद्र पावरा - जय रावण प्रतिष्ठान महा.राज्य संघटक यांनी ग्रामसभेत अर्जाव्दारे मागणी केली...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध