Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

सामाजिक न्याय पर्व निमित्ताने भारतीय संविधानाची जागृती...!



सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव आणि समाजकार्य महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर 2022 कालावधीत सामाजिक न्यायपर्व विविध उपक्रमाने साजरी करण्यात येत आहे. 


या उपक्रमांतर्गत महाविद्यालयामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला तसेच भारतीय संविधान, नागरिकांची अधिकार - कर्तव्य, संविधानिक सुरक्षा अशा विविध विषयावर व्याख्यान निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा गीत गायण स्पर्धांचे आयोजन महाविद्यालय मार्फत अंमळनेर शहरात विविध ठिकाणी करण्यात येत आहे. 


समाजकार्य महाविद्यालयाचे संस्थापक चेअरमन दादासो सुभाष भांडारकर यांनी या उपक्रमाच्याप्रसंगी भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका आणि नागरिकांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या याची पत्रके छापून अमळनेर शहरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, वाड्यावर समुदायावर त्याचे वितरण करून उद्देश पत्रिकेचे सामुदायिक वाचन घेण्यात येत आहे. 

या निमित्ताने नागरिकांमध्ये भारतीय संविधानाची जनजागृती, संविधानाप्रती आदर,आणि मूलभूत हक्क व कर्तव्यांची जाणीव करण्यात येत आहे. 
या उपक्रमात महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उत्साहाने सहभाग घेऊन क्षेत्रकार्याच्या माध्यमातून उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी सामाजिक न्याय विभाग व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध