Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

धुळे जिल्ह्यातील सीड्स,पेस्टिसाइड व फर्टीलायझर विक्रेत्यांची बैठक शिरपूर येथे नुकतीच संपन्न...!



शिरपूर प्रतिनिधी:या बैठकीच्या अध्यक्षस्थानी इंडिया ऍग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहनजी कलंत्री होते.प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष सत्यनारायणजी कासट,माफदाचे सचिव भोकरे, माफदाचे दिनेशजी मुंदडा,माफदाचे यशवंत अमृतकर, माफदाचे दीपक मालपुरे,निवृत्त जिल्हा कृषी अधिकारी पी एम सोनवणे, माफदाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी भंडारी धुळे जि.प.चे मोहीम अधिकारी प्रदीप निकम, कृषी अधिकारी राजेश चौधरी आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन संघटनेमार्फत करण्यात आला.
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सत्यनारायणजी कासट,निवृत्त कृषी अधिकारी पी एम सोनवणे , जिल्हाध्यक्ष मानसिंग गिरासे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी ग्रामीण भागातील कृषी विक्रेता हेमंत चौधरी व गौरव अग्रवाल यांनी कृषी विक्रेत्यांना येणाऱ्या विविध अडचणी बाबत तक्रारी मांडल्यात.यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन जी कलंत्री यांनी कृषी विक्रेत्यांनी मांडलेल्या विविध तक्रारींचे निरसन केले.तसेच संघटना कशी उभी राहिली. संघटनेची वाटचाल कशी सुरू आहे. केंद्र सरकारकडे कृषी विक्रेत्यांना येणाऱ्या विविधअडचणी कसे सोडवल्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.संघटनेच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.प्रास्ताविक जिल्हा संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष साहेबचंद जैन यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा संघटनेचे सचिव संजय चौधरी यांनी केले.
या बैठकीस जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप उपाध्ये, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष कनुभाई, धुळे तालुका अध्यक्ष देविदास माळी, युवराज जैन ,डी.एन.बडगुजर ,आशिष अग्रवाल, विवेक पाटील ,नामदेव धनगर, राजेंद्र जाधव, प्रकाश वाणी ,पप्पू अग्रवाल, नागराज पाटील, मनीष करणकाळ ,दिनेश पाटील ,सोहेल ओसवाल ,अनिल अग्रवाल व जिल्ह्यातील बहुसंख्य कृषी विक्रेते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेश पगारे व हेमंत चौधरी यांनी परिश्रम घेतले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध