Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

प्रा.माधुरी गडसिंग-ढोकळे यांना पीएच.डी.प्रदान..!



नळदुर्ग नळदुर्ग प्रतिनिधी: कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रामदास ढोकळे यांच्या सुविद्य पत्नी प्रा.माधुरी गडसिंग-ढोकळे,जवाहर महाविद्यालय,अणदुर यांना गणित विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी.पदवी प्रदान केली आहे.

त्यांनी श्रीकृष्ण महाविद्यालय,गुंजोटी येथील डॉ. जगदीश ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली "स्टडीज ऑन सोल्युशन्स ऑफ फ्रॅक्शनल डिफरेंसिअल इक्वेशन्स अँड एप्लीकेशन्स " या विषयावर विद्यापीठाला शोध प्रबंध सादर केला होता. त्यांच्या या यशाबद्दल श्री.रामचंद्र दादा आलुरे, (अध्यक्ष, जवाहर महाविद्यालय विकास समिती )महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी व सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील संशोधन कार्यास शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध