Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

गुजराथ विधानसभा निवडणुकीत सहभाग घेवुन भाजपा उमेदवारांचा प्रचार करावा - बबनराव चौधरी



शिरपूर प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा ९५ व्या मन की बात कार्यक्रम दि.२७ नोव्हेंबर रविवार रोजी मन की बात बुथ बैठक के साथ कार्यक्रम येथील बबनराव चौधरी यांचा संपर्क कार्यालयात संपन्न झाला.देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा लोकप्रिय मन की बात कार्यक्रम भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी शिरपूर येथे कार्यकर्त्यां सोबत बसून सर्वांनी एकत्रितपणे कार्यक्रम पाहिला व ऐकला.'मन की बात' पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा महिन्याचा शेवटचा रविवारी हा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाची अतिश्य लोकप्रियता वाढली आहे. २०१४ मध्ये 'मन की बात' हा कार्यक्रम सुरू झाला.पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाने देशात लोकप्रियता का वाढली आहे आणि नवसंजीवनी मिळाली आहे तर 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशातील जनतेशी संवाद साधत असतात. हा एक अभिनव कार्यक्रम आहे. 


या कार्यक्रमाद्वारे प्रत्येक नागरिकाला जोडलं जातंय, सूचना मागवल्या जातात आणि त्यांना शासनाचा एक भाग होण्याची संधीही दिली जाते असे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले. दूरदर्शनचे चॅनेल्स आणि खासगी टीव्ही चॅनेल्सद्वारे संपूर्ण भारतात या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते. या कार्यक्रमामुळे नागरिकांची रुची वाढली असून जागरूकताही निर्माण झाली आहे,असे ही बबनराव चौधरी यांनी सांगितलं.याप्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी,शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी,शहराध्यक्ष हेमंत पाटील,ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे,भाजपा अनु.जाती मोर्चा मा. जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार,भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी,भाजपा भटक्या विमुक्य आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी,शहर उपाध्यक्ष अनिल बोरसे, टेकवाडे येथील सुभाष चौधरी महाराज, राजेंद्र चौधरी,विजय चौधरी,टेकवाडे विकासो चेअरमन दिलीप धनगर, संदीप कोळी,डाॅ.राणा सरदार, दुर्गेश पटेल,संजय कोळी आदि उपस्थित होते. 


प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी पुढे म्हणाले की, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व हिंतचितक यांनी गुजराथ मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत सहभाग घेवुन पक्षाचा प्रचार करावा, किंवा तेथील मतदार, नातलग व समाजबांधवांशी संपर्क साधुन पक्षाचा उमेदवारास मतदान करण्यासाठी आवाहान करावे. मी सोमवार दि. २८ नोव्हेंबर रोजी गुजराथमध्ये पदाधिकार्‍यांनसोबत प्रचारास जाणार आहे तसेच शिरपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतसाठी हि निवडणुक होत आहे या निवडणुकीत ही भाजपाचे १७ च्या १७ जागेवर सरपंच व सदस्य निवडुन येतील यासाठी सर्वांनी लक्ष घालावे असे आवाहान केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध