Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

ग्रामपंचायतींसाठी ऑनलाइन होणार प्रक्रिया...! धुळे जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक आजपासून भरणार अर्ज ;



शिरपूर प्रतिनिधी: धुळे जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी आज सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. उमेदवारांना २ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील.थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने चुरस वाढली आहे.धुळे तालुक्यात ३३, शिरपूर तालुक्यात १७, साक्री तालुक्यात ५५ आणि शिंदखेडा तालुक्यात २३ ग्रामपंचायतींची निवडणुक होते आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्या सेामवारपासून सुरू होत असल्याने इच्छुक उमेदवारांची प्रतिज्ञापत्र, जातवैधता प्रमाणपत्र, कर भरल्याचा दाखला आदी कागदपत्र जमा करण्यासाठी धावपळ सुरू आहे.

त्यामुळे सेतू केंद्र आणि स्टॅम्प विक्रेत्यांकडे आठ दिवसापासून गर्दी आहे.तहसील प्रशासनातर्फे निवडणूकीची तयारी सुरू असून ईव्हीएम मशीनची तपासणी झाली आहे. निवडणुकीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली असून त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.अनेक ग्रामपंचायतीची निवडणुक चुरशी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे वातावरण तापले असून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.निवडणूकीमुळे वातावरण तापले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध