Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०२२

साक्री तालुक्यातील पेरेजपुर येथे डाळिंब फळबाग योजने अंतर्गत फळपीक कार्यशाळा कार्यक्रम शेतकऱ्यांचा व कृषी अधिकाऱ्याचा उपस्थितीत सम्पन्न



मौजे पेरेजपुर येथे डाळिंब पिकाची शेतीशाळचे आयोजन कृषी विभागाकडून
फळबाग योजनेअंतर्गत डाळिंब पिकाची शेतीशाळा मोजे पेरेजपुर येथील शेतकरी श्री अनिल भाऊसिंग शेवाळे यांच्या शेतात घेण्यात आली .या शेती शाळेत कृषी सहायक जे.बी.पगारे यांनी शेतकऱ्यांना डाळिंब पिकाबद्दल, डाळिंब लागवडीबद्दल,. खत व्यवस्थापन बद्दल, रोग किडी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या शेती शाळेत शेतकऱ्यांना ठिबक सिंचना बद्दल माहिती दिली व ठिबकचे महत्त्व विषयी सविस्तर माहिती दिली, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड याविषयी माहिती दिली, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या डाळिंब पिकाच्या शेती शाळेला गावातील श्री रवींद्र लाला शेवाळे, सरपंच मनोज देसले,रावसाहेब सोनू शेवाळे, किशोर भास्कर शेवाळे ,जगदीश नानाभाऊ शेवाळे ,भाईदास यादव सोनवणे, नाना रतन पगार, प्रल्हाद आनंदा सोनवणे, मधुकर बाबुलाल पगारे, पवन रावण पवार ,सुमित विठ्ठल शेवाळे ,राहुल मधुकर शेवाळे असे मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
या शेतीशाळेला श्री. एस.बी.शिंदे. मंडळ कृषी अधिकारी साक्री. यांनी मार्गदर्शन केले


तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध