Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याने अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्य इसमास ठोकल्या बेड्या
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याने अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्य इसमास ठोकल्या बेड्या
नंदुरबार प्रतिनिधी - गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून गुजरात राज्याला लागुन असलेल्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हयात देखील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आलेली आहे. नंदुरबार जिल्हयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री.बी.जी.शेखर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यास भेट दिली होती.त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अवैध दारु वाहतुक,बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी यावर कठोर कारवाई करण्याचे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांना निर्देश दिले होते.
नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांनी देखील अवैध दारु वाहतुक, बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी यावर कठोर कारवाई करण्याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते.तसेच नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक हे देखील स्वतः सर्व गोष्टीवर देखरेख ठेवून जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना मार्गदर्शन करीत होते.
दिनांक 28/11/2022 रोजी रात्री नंदुरबार शहरात मच्छी बाजारात एका इसमाकडे गावठी बनावटीचे पिस्टल असून तो ते विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय बातमी नंदुरबार विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री सचिन हिरे यांना मिळाली.त्यांनी तात्काळ नंदुरबार शहर पोलीसस्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र कळमकर यांना कारवाई करण्याचे सुचना दिल्या नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र कळमकर यांनी तातडीने नंदुरबार शहर पोलीस ठागेचे पोउनि / सागर आहेर यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे दोन पथके तयार केली.
सदर पथकांनी मच्छी बाजार परिसरात सापळा रचला असता मच्छी बाजाराजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयाशेजारी असलेल्या मोकळया मैदानातील पाण्याच्या टाकीजवळ एक इसम हा संशयितरीत्या फिरत असतांना दिसून आला.
पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यानं त्याचे नाव पांडुरंग बाबुराव प्रजापती,वय 56 वर्षे,रा.अहिल्याबाई विहीरीजवळ, कुंभारवाडा,नंदुरबार ता. जि.नंदुरबार असे सांगितले.तसेच तो वांरवार त्याचे कमरेला हात लावत असल्याचे दिसून आल्याने पोलीसांनी लागलीच दोन पंचाना बोलावून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात 20,000/- रपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल व दोन पिवळया धातुचे जिवंत काडतुसे मिळुन आले.
सदरच्या वस्तू पोलीसांनी कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केल्या. तसेच त्य्स नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आणून त्याचे विरुध्द गु.रजि.नं.744/2022 भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन 25 सह महा.पो.का.कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन भविष्यात कोणी अवैध शस्त्र जवळ बाळगल्यास त्याची गय केली जाणार नाही,असा नंदुरबार जिल्हा पोलीसांकडुन इशारा दिलेला आहे.सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक,नंदुरबार श्री.पी.आर.पाटील सो.,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे सो,नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सचिन हिरे साो. यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोउनि / सागर आहेर, पोहेकॉ /अतुल बि-हाडे, पोहेकॉ/जगदिश पवार, पोना/भटु धनगर, पोना/बलविंद्र ईशी, पोना / स्वप्निल शिरसाठ,पोशि/ अनिल बडे, पोशि/ विजय नागोडे, पोशि/ अफसर शहा यांच्या पथकाने केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा