Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची ईडीमार्फत चौकशी होणार,विशेष पीएमएलए न्यायालयाचा आदेश



भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने मोठा दणका दिला. बनावट स्टॅम्प पेपर घोटाळय़ातील फडणवीस यांच्या सहभागाबाबत अॅड. सतीश उके यांनी केलेल्या तक्रार अर्जाची गंभीर दखल घेत न्यायालयाने या प्रकरणात ईडीला सखोल चौकशीचा आदेश दिला आहे. उके यांनी त्यांच्या अर्जामध्ये फडणवीस यांच्याबाबत अनेक गंभीर आरोप केले आहेत.15 वर्षांपूर्वी अॅड. उके यांनी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळय़ातील अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा केला. त्यातील राजकीय लागेबांधे उघडकीस आणले.
त्यावेळी घोटाळय़ातील मास्टरमाइंड धरमदास रामाणी यांना वाचवण्याचा खटाटोप देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला. याचदरम्यान उके यांच्याविरोधात धरमदास रामाणी यांनी खंडणीची तक्रार दाखल केली. नंतर त्या तक्रारीत तथ्य नसल्याचे तपासात सिद्ध झाले आणि पोलिसांनी ‘बी समरी’ अहवाल दाखल केला. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी 15 वर्षांपूर्वीच्या खंडणीच्या तक्रारीचा फेरतपास करीत उके यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. यावेळी उके यांनी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळासंबंधित आपल्या तक्रारीचे काय झाले, अशी विचारणा केली.
त्यावर संबंधित घोटाळा दडपण्याचेच प्रयत्न सुरू झाले. ते प्रकरण मागे टाकून ईडीने अलीकडेच रामाणी व देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळय़ातील कारनाम्यासंबंधीत कागदपत्रे आपल्या घरातून जप्त केली. या सर्व कारनाम्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करीत उके यांनी मंगळवारी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला.
या अर्जाची विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी गंभीर दखल घेतली आणि बनावट स्टॅम्प पेपर घोटाळय़ाचा कथित मास्टरमाइंड धरमदास रामाणी, देवेंद्र फडणवीस व नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची सखोल चौकशी करण्याबाबत ईडीच्या दिल्लीतील संबंधित विभागाला आदेश दिला.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध