Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १७ डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
गुरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई ; १९ गुन्हे उघडकीस संशयित आरोपींकडून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता...!
गुरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई ; १९ गुन्हे उघडकीस संशयित आरोपींकडून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता...!
जळगाव - प्रतिनिधी: जिल्ह्यात विविध भागातून गुरांची चोरी करणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून टोळीतील तीन संशयित आरोपींना अजिंठा चौक परिसरातून दोन चारचाकींसह अटक केली आहे.जळगाव जिल्ह्यातील १९ गुन्हे उघडकीला आले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषदेत दिली.जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून गेल्या काही दिवसांपासून गुरांची चोरी होत असल्याबाबत अनेक गुन्हे दाखल होते.
यासंदर्भात गुरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या सुचना पोलीस अधिक्षकांनी दिले.त्यानुसर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली.यात धरणगाव तालक्यातील पाळधी येथील मोहंमद फयाज मोहंमद अयाज हा अजिंठा चौकात स्कॉर्पीओ कार क्रमांक (एमएच १२ बीव्ही ९४१५) घेवून उभा असल्याची गोपनिय माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले.त्याची अधिक चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने गुरे चोरी केल्याची कबुली दिली.यात वसीम मोहमंद अस्लम कुरेशी आणि नईम शेख कलीम दोन्ही रा.मासुमवाडी यांना देखील अटक केली आहे.
तर जाफर गुलाबर नबी रा.पाळधी ता.धरणगाव, हारून उर्फ बाली शहा रा.धुळे,अरशद रा.धुळे, आणि मनोज उर्फ मोन्या विठ्ठल पाटील रा.कुसुंबा ता.जळगाव असे इतरांचे नाव निष्पन्न झाले असून त्यांचाही शोध सुरू आहे.
या कारवाईत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकुण ३ जणांना अटक केली असून दोन स्कॉर्पीओ वाहने जप्त केली आहे.
जामनेर - १, भडगाव-२, अमळनेर-३, एरंडोल - २, पारोळा-२, चोपडा-१, जळगाव तालुका-३, मुक्ताईनगर-४, पाचोरा - १ असे एकुण १९ गुन्हे उघडकीला आले आहे. संशयित आरोपींकडून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा