Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड ग्रामपंचायत च्या उपसरपंच व भावावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी...!
चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड ग्रामपंचायत च्या उपसरपंच व भावावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी...!
खोटा गुन्हा दाखल करून जीवे मारण्याची पत्रकाराला धमकी
चाळीसगा(प्रतिनिधी) – बातमी घेत असताना चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड ग्रामपंचायत च्या उपसरपंच याने त्याच्या भावासह दैनिक भास्कर चे पत्रकार तथा आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे (ऑल इंडिया पत्रकार संघटना) महाराष्ट्र राज्य प्रदेश महासचिव सूर्यकांत कदम यांच्यावर दि 15 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1-15 वाजेच्या सुमारास चाळीसगाव पंचायत समितीच्या गेट समोर हल्ला करून शिवीगाळ,दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देत आमच्याविरोधात पोलीस स्टेशन ला तक्रार केल्यास खंडणीचा व इतर कोणताही गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली आहे याप्रकरणी पत्रकार कदम यांनी रवींद्र मोरे व सिद्धार्थ मोरे या दोघांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून दोघांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हा!वा अशी मागणी केली आहे.
तशा आशयाचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान,केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,गृहमंत्री,पोलीस महासंचालक यांच्यासह पोलीस अधिकारी,पत्रकार बांधव यांना दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की दि 15 डिसेंबर रोजी कदम हे चाळीसगाव पंचायत समिती समोरून जात असताना पिंपरखेड ता चाळीसगाव येथील ग्रामस्थांनी त्यांना बातमीचे निवेदन दिले ते निवेदन घेऊन ते पंचायत समिती मध्ये जात असताना रवींद्र दिलीप मोरे रा पिंपरखेड ता चाळीसगाव याने त्यांच्या अंगावर येऊन माझ्याकडे ताठ का बघतो म्हणून माझ्याशी खेटू नको असे म्हणून हुज्जत घालून शिवीगाळ करून तू आमच्या विरोधात बातम्या छापतो का तुझे हातपाय तोडतो तुला मारून टाकेन असे म्हटला तेव्हा त्याचा भाऊ ग्रामपंचायत उपसरपंच सिद्धार्थ मोरे याने अंगावर धावून येत तुला जिवंत सोडणार नाही तू पत्रकार असला तरी आम्ही पत्रकारांना घाबरत नाही तुला ज्या बातम्या छापायाच्या त्या छाप असे म्हणून झटापटी करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व तू आमच्या विरोधात पोलीस स्टेशन ला तक्रार दिली तर आम्ही ग्रामपंचायत चे पदाधिकारीआहोत आम्ही ग्रामपंचायत ची कामे घेऊन ठेकेदारी करतो त्या कामांबद्दल तू आमच्याकडे पैसे मागतो असा खोटा खंडणीचा व दुसरा काहीपण खोटा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली असे म्हटले असून दोघे भाऊ आडदांड व खुनशी आहेत कदम यांच्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास त्यास रवींद्र मोरे व सिद्धार्थ मोरे हे जबाबदार राहतील असे म्हणत दोघांवर पत्रकार संरक्षण कायदा व क्रिमिनल लॉ अमेंटमेंट 1932 चे कलम 7 (1) (a) नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे असे न झाल्यास आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने देशभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा