Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

५० सरपंच व २५६ सदस्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद साक्री तालुक्यातील १६७ मतदान केंद्र सज्ज, ७ पथक राखीव



साक्री तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पाच ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. १६७ केंद्रे मतदान प्रक्रियेसाठी सज्ज केली आहेत.निवडणूक कर्मचाऱ्यांची ७ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. ५० सरपंच व २५६ सदस्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.साक्री तालुक्यातील ५० गावातील सरपंचांची जनतेतून थेट निवड होणार आहे. यासाठी मुख्यत्त्वे कासारे,धाडणे,भाडणे,वसमार व डेगाव या काही मोजक्या गावाच्या निवडणुकीतील चुरस खूप वाढली आहे. पाच सरपंच व २१५ सदस्य आधीच बिनविरोध झाले आहेत. उर्वरित सरपंच पदाच्या ५० जागांसाठी एकूण १७९ उमेदवार तर २५६ सदस्य पदासाठी ५३७ उमेदवार रिंगणात आहेत.प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकारी तसेच एक शिपाई व एक पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड नियुक्त केले आहेत. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची चुरस पाहता काही संवेदनशील गावांमध्ये साक्री, पिंपळनेर व निजामपूर पोलीस ठाण्याचे फिरते गस्त पथक नियुक्त केले आहे. सकाळी ७:३० ते ५:३० वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर मतदान यंत्र सील करून साक्री तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रुममध्ये ठेवली जाणार आहेत.


तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध