Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ११ डिसेंबर, २०२२

शिरपूर तालुक्यातील 20 तलाठी कार्यालय निवासी इमारत आणि 5 मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयाच्या संलग्न इमारतीच्या बांधकामासाठी 9 कोटी 16 लाख रुपयांचा निधी मंजूर आ. अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या प्रयत्नांना यश...!




शिरपूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण,क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार आ. अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने शिरपूर तालुक्यातील 20 तलाठी कार्यालयास निवासी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 6 कोटी 44 लाख 90 हजार रुपये आणि तालुक्यातील 5 मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयाच्या संलग्न इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 2 कोटी 71 लाख 30 हजार रुपये असा एकूण 9 कोटी 16 लाख रुपयांचा भरघोस निधी महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झाला आहे.

शिरपूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. सदर तालुक्यात तलाठी व मंडळ कार्यालयाची इमारत नसल्याने नागरिकांना महसूल विभागाच्या संबंधित कामासाठी अडचणी निर्माण होत आहेत.तरी शिरपूर तालुक्यात तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालय इमारतीच्या बांधकामाला मंजूरी प्रदान करुन निधी उपलब्ध करुन द्यावे असे पत्र आ.अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील (मंत्री,महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य,मुंबई-३२) यांना देवून पाठपुरावा केला होता.
शिरपूर तालुक्यातील २० तलाठी कार्यालयास निवासी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी ६ कोटी ४४ लाख ९० हजार रुपये तसेच शिरपूर तालुक्यातील ५ मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयाच्या संलग्न इमारतीचे बांधकाम करण्यासाठी २ कोटी ७१ लाख ३० हजार रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्याने तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

२० तलाठी कार्यालय सह निवासी इमारतींचे मौजे मांडळ,उंटावद,हिंगोणी बु.,आमोदे,मांजरोद,होळनांथे,भाटपुरा, पिळोदा,वाठोडा,सावळदे,गिधाडे, जातोडे,आढे (पिंप्री),भरवाडे,वनावल,
खामखेडा प्र.आ.,भटाणे, वे भामपुर,
करवंद,खंबाळे,ता.शिरपूर तसेच शिरपूर तालुक्यातील ५ मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयाच्या संलग्न इमारतीचे बांधकाम मौजे थाळनेर,अर्थे, जवखेडा,बोराडी, सांगवी,ता.शिरपूर जि.धुळे येथे होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध