Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ११ डिसेंबर, २०२२

कृषी विज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश.या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला असून,चिंता दूर झाली असल्याने समाधान व्यक्त...




पंकज पाटिल (उपसंपादक- तरुण गर्जना) महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळी पाऊस व अनेक नैसर्गिक संकटांनी त्रस्त असताना महावितरण कंपनीद्वारे कृषी वीजपुरवठा खंडित करण्याचा उपक्रम युद्धपातळीवर सुरू होता.


शेतकऱ्यांचा पावसाळी हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर आता रब्बी हंगाम बऱ्यापैकी डोळ्याला दिसत असताना ऐन पिकाला पाणी देण्याच्या वेळेवर महावितरण कंपनीने वसुलीसाठी शेतीपंपांची विष खंडित करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले होते. महावितरण कंपनीच्या या सक्तीच्या वसुलीमुळे हातचे पीक उध्वस्त होणार या चिंतेने राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत होते.

राज्यातील शेतकऱ्यांचा हा असंतोष पाहून महावितरण कंपनीचे देयके व महसूल मुख्य अभियंता यांनी कृषी पंप ग्राहकांचा वीज पुरवठा चालू किंवा थकबाकी वसुली करता तसेच इतर कोणत्याही कारणास्तव पुढील आदेशापर्यंत खंडित केला जाणार नाही असा निर्णय १० डिसेंबर २०२२ रोजी घेतलेला आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला असून,चिंता दूर झाली असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध