Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

प्रा.डॉ.हेमंत खैरनार धुळे भुषण पुरस्काराने सन्मानित..!



प्रा.डॉ.हेमंत खैरनार धुळे भुषण पुरस्काराने सन्मानित..!

शिरपूर येथील होमिओपॅथिक तज्ञ आणि सेंधवा (म.प्र.) येथे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय प्राध्यापक तथा शैक्षणिक प्रभारी म्हणून कार्यरत प्रा.डॉ.हेमंत खैरनार यांना पुणे येथील ग्लोबल एज्युकेशन फाउंडेशन कडुन पद्श्री मा.पोपटराव पवार  यांच्या हस्ते धुळे भूषण (डायनॅमिक प्रोफेसर ऑफ होमिओपॅथी)हा पुरस्कार लोक शाहिर आण्णा भाऊ साठे सभागृह (पुणे) येथे त्यांच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील कामगीरी बद्दल देण्यात आला.प्रा.डॉ.हेमंत खैरनार हे गेल्या ११ वर्षां पासून होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असुन ते शेकडो विद्यार्थ्यांना होमिओपॅथिक चिकित्सा पद्धती ची प्रेरणा देत आहेत.त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.या पुरस्कारासाठी त्यांचे सामाजिक,वैद्यकीय व शैक्षणिक स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध