Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि इतर राज्य पुरस्कृत आवास योजनेत धुळे जिल्हा परिषदेला तीन पुरस्कार प्राप्त...!



प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि इतर राज्य पुरस्कृत आवास योजनेत धुळे जिल्हा परिषदेला तीन पुरस्कार मिळाले आहेत.
काल मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ना.राहुल नार्वेकर,राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अश्विनी पवार,माजी अध्यक्ष तुषार भाऊ रंधे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस.,माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वान्मथी सी.,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्रीमती प्रतिभा संगमनेर, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे व जिल्हा ऑपरेटर श्री. अमोल माळी यांना हा पुरस्कार प्रधान करण्यात आला.
      
धुळे जिल्हयाला शबरी आवास योजनेत राज्यात प्रथम व प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.तसेच महाराष्ट्रातील बेस्ट ऑपरेटर म्हणून विशेष पुरस्कार श्री.अमोल माळी यांना प्रदान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध