Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १० डिसेंबर, २०२२

धुळे तालुक्यातील चिंचवार येथे आम आदमी पक्षाचे धुळे जिल्हा शाखा फलकाचे अनावरण



धुळे प्रतिनिधी:-धुळे तालुक्यातील चिंचवार येथे आम आदमी पक्षाचे धुळे जिल्हा शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले असून जिल्ह्यात पहीलीच शाखा फलकाचे उद्घाटन झाले आहे.यावेळी आम आदमीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष तुषार निकम तसेच धुळे जिल्हा अध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या हस्ते (दि १०) शनिवारी सायंकाळी फलक अनावरण करण्यात आले.

धुळे जिल्ह्यात गावागावात आम आदमी पक्षात प्रवेश करण्यासाठी पदाधिकार्यांकडे संपर्क साधत आहेत.(दि १०) शनिवारी सायंकाळी चिंचवार येथे बसस्थानक परिसरात आम आदमी पक्षाचे शाखा फलकाचे उद्घाटन झाले.यावेळी जळगाव जिल्हा अध्यक्ष तुषार निकम, धुळे जिल्हा अध्यक्ष ईश्वर पाटील, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष फिरुन शिंदे यांच्या हस्ते फलकाचे उद्घाटन झाले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष महारु पाटील, जिल्हा सचिव अनिल पवार,तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अकबर पटेल, तालुका उपाध्यक्ष शाहरुख पटेल होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध