Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १३ डिसेंबर, २०२२

शिरपूर शहर पोलिसांची दमदार कामगीरी...वाडी "खु" येथे बनावट देशी व विदेशी दारु बनविण्याचा कारखाना केला उध्वस्त..!





शिरपूर शहर पो.स्टे.जि.धुळे चे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी (बनावट देशी व विदेशी दारु बनविण्याचा कारखाना उध्वस्त करुन आयशर व पिकअप वाहनासह बनावट देशी व विदेशी दारू तसेच साधन सामग्रीसह एकुण १६,०७,१२०/- रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत) दि.१०.१२.२०२२ रोजी ०९.०० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री. ए.एस.आगरकर यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,वाडी खुर्द ता.शिरपुर गावात वाडी खुर्द ते निमझरी गावाकडे जाणान्या रस्त्यालगत असलेल्या भिल वस्तीतील समाज मंदीराचे मागील बाजुस इसम नामे महेंद्र भाईदास भिल हा त्याचे राहते घरात गैरकायदेशीररित्या स्पिरीट नावाचा गुंगिकारक मादक पदार्थापासून बनावट व मानवी आरोग्यास अपायकारक अशी बनावट दारु तयार करण्यासाठी तो आपले कब्जात स्पिरीट नावाचा अंमली पदार्थ बाळगुन त्यापासुन बनावट देशी व विदेशी दारू तयार करण्याचा कारखाना चालवित असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली.

त्यावरुन शिरपुर शहर पो.स्टे.चे पोलीस अधिकारी व शोध पथकाचे अंमलदार यांनी दोन पंचांसह वाडी खुर्द ता.शिरपुर जि.धुळे गावात जावून खात्री केली असता इसम नामे- महेंद्र भाईदास भिल हा त्याचे राहते घराचे पुढील ओटयाचे भागात काडयांचे आडोशास जमिनीवर बसुन काचेच्या रिकाम्या बाटलीत आंबट उग्र वासाची दारू भरुन काचेच्या बाटल्यांना मशिनव्दारे बुच लावतांना दिसल्याने त्याचेवर ०९.५० वाजता छापा टाकुन त्यास एकुण ०९ खोके बनावट देशी टंगो पंच नावाची देशी दारु व मॅकडॉल नं.१ व्हिस्की नावाची विदेशी दारु,तसेच बनावट देशी विदेशी व दारु बनविण्यासाठी लागणारे स्पिरीट नावाचा मादक द्रव पदार्थ,दारुच्या बाटल्यांना लावण्याचे लेबल, बुध, प्लास्टीक ड्रम कॅन,पुठ्याचे खोके,
कॅपिंग मशिन व इतर साधने तसेच आयशर कंपनीचा ट्रक क्र.एम.एच.२०/बी.टी. ४९६६ व महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन क्र.एम.एच.१२/ जी.टी. ६३०० व मोबाईल असा एकुण ९६,०७,१२०/-रु. कि.च्या मुद्देमालासह बनावट देशी व विदेशी दारू तयार करण्याचा कारखाना चालवितांना जागीच पकडले.त्यास जप्त माल कोणाचा असुन तु कोणाचे सांगणे वरुन बनावट देशी व विदेशी दारुचा माल तयार करीत असुन तो माल कोठे व कोणाकडे कोणाच्या मदतीने व कोणत्या साधनानी विक्रीसाठी वाहतुक करीत असल्याबाबत विचारपुस करता त्याने जप्त माल हा इसम नामे इंद्रसिग उर्फ पिन्टु भिल रा.वाडी ह.मु.शिरपुर व इतर भागीदार इसमांचा असुन त्यांचे सांगणेवरुन व त्यांचे मदतीने तो सदरचा माल तयार करून मागणी नुसार विक्रीसाठी आयशर व पिकअप वाहन मध्ये भरून नेत असल्याचे सांगितल्याने त्याचे व त्याचे भागीदार साथीदार अशांविरुध्द शोध पथकाचे पोहेकॉ / ९९९ लादूराम विठ्ठल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरपुर शहर पो.स्टे. गुरनं. ६८९ / २०२२ भादंवि कलम ३२८,३४ सह मु.प्रो.का.क ६५ (इ) (फ). ८१.८३ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री.संजय बारकुंड,
मा.अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.दिनेश आहेर यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री.ए.एस.आगरकर, पोउनि / गणेश कुटे तसेच शोध पथकाचे पोहेकॉ ललित पाटील, लादूराम चौधरी,पोना/ हेमंत पाटील,
पोकों/मुकेश पावरा,गोविंद कोळी,
विनोद अखडमल, प्रविण गोसावी,
मनोज दाभाडे, कैलास चौधरी,स्वप्नील बांगर,अमित रणमळे व प्रशांत पवार (आर.सी.पी.) व होमगार्ड नाना अहिरे, मिथुन पवार, चेतन भावसार, शरद पारधी अशांनी मिळून केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध